Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंडीत भारुड यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर

कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर येथील  पंडित भारुड  यांना कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रोडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने  राज्यस्तरीय कला

गटसचिवांना जिल्हा बॅंकने वैदयकिय विमा सुरक्षा कवच दयावे : कोल्हे
शनिशिंगणापुरात शनि लीलामृत पाच दिवसीय ग्रंथ पारायण
चांगल्या कार्याचा सन्मान करणे हे साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कर्तव्य – नगरसेवक सुनिल त्र्यंबके

कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर येथील  पंडित भारुड  यांना कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रोडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने  राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे.हा पुरस्कार  चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीदिनी नाशिक येथे प्रदान करण्यात येणार आहे .भारुड यांनी कै. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे  यांच्या जीवन कार्यावर आधारित 45मिनिटांची डॉक्युमेंटरी फिल्म ’’विजयी गाथा’ बनविली असून कोल्हे साहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र, पोवाडे, गीते भारुड यांनी स्वतः लिहिलेले आहे . तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान व्याख्यान सीडी त्याचप्रमाणे त्यांनी मराठी गीतांचे रेकॉर्डिंग केलेले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार 2024जाहीर झाल्याचे निवडीचे पत्र आयोजक स्वागताध्यक्ष सुनील मोंढे  नाशिक यांनी त्यांना नुकतेच दिले आहे.भारुड यांनी गंडेतोडे, लाव्हा ,क्रांतिसूर्या,पीसीबी,आदी प्रबोधनात्मक  पुस्तकाचे लेखनही केलेले आहे. त्यांना सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता तसेच समाजभूषण असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार  प्राप्त झालेले आहे .त्यांच्या या यशाबद्दल  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन नितीन  कोल्हे, मा. आमदार  स्नेहलताताई बिपिन  कोल्हे, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी विश्‍वस्त अमित कोल्हे तसेच  कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक  कोल्हे तसेच गायक सुधीर रूपवते यांनी भारुड यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

COMMENTS