Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमती नलिनी बन्सीलाल अहिरे (बागुल) यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्रदान

नाशिक प्रतिनिधी -  शिक्षक दिनाच्या दिवशी, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामद

सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाच्या कामाची जिल्हाधिकार्‍यांकडून पहाणी
महानगरपालिका क्षेत्रात, दिव्यांगाच्या दारी अभियान सर्वेक्षणास प्रारंभ
देशातील 10 राज्यांना केंद्राचा अलर्ट | DAINIK LOKMNTHAN

नाशिक प्रतिनिधी –  शिक्षक दिनाच्या दिवशी, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब, व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक  केसरकर साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नामदार एडवोकेट राहुल नार्वेकर साहेब, मा. आमदार विक्रम काळे साहेब मा. आमदार कपिल पाटील साहेब,यांच्या हस्ते , श्रीमती नलिनी बन्सीलाल अहिरे  (बागुल), उपशिक्षिका,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- बानगंगानगर (ओझर टाऊनशिप )तालुका निफाड जिल्हा नाशिक यांना, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले , गुणवंत आदर्श शिक्षिका,पुरस्कार मिळाला . गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे नाशिक जिल्ह्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे, कोरोना काळात शाळा बंद असताना श्रीमती नलिनी अहिरे यांनी बोलक्या बाहुल्यांचा द्वारे शिक्षक आपल्या दारी हा त्यांचा उपक्रम भारतभर आदर्शवत ठरला. या कार्याबद्दल त्यांना अनेक नामांकित पुरस्कार मिळाले. श्रीमती नलिनी अहिरे (बागुल )यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल,  महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री देवोल साहेब, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त ,आदरणीय सुरज मांढरे साहेब व महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

COMMENTS