Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाराती’ त हजसाठी जाणार्‍या भाविकांची वैद्यकिय तपासणी सुरू करा

खा.बजरंग सोनवणे यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदनबीड । प्रतिनिधीहज यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांच्या वैद्यकीय तपासणी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळ

कपिलधार देवस्थान येथे 16 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला
शेतकरी हक्क मोर्चाच्या दणक्याने तूर खरेदी केंद्र सुरू
Beed : तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते गणेश विसर्जन (Video)

खा.बजरंग सोनवणे यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
बीड । प्रतिनिधी
हज यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांच्या वैद्यकीय तपासणी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे अंबाजोगाई व परिसरातील भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाचे खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार हज यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांची वैद्यकीय तपासणी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे करण्यात येते. मात्र सध्या आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रणालीसाठी आवश्यक असलेले आयडी व पासवर्ड केवळ जिल्हा शल्यचिकीत्सकाकडे आहे. यामुळे स्वारातीत यात्रेला जाणार्‍या भाविकांची वैद्यकिय तपासणी करण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणी प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत असून भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.अंबाजोगाई शहर तसेच आजूबाजूच्या तालुक्यांतून यावर्षी सुमारे 100 हून अधिक भाविक हज यात्रेसाठी जाणार आहेत. अनेक भाविक वयोवृद्ध असून त्यांना जिल्हा रुग्णालयात वारंवार जावे लागत असल्याने शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात आधीच मोठी गर्दी असून मर्यादित सुविधा असल्याने भाविकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे आवश्यक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, मनुष्यबळ व प्रशासकीय क्षमता उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय कारणांमुळे तपासणी प्रक्रिया रखडल्याची बाब खा.सोनवणे यांनी निवेदनात नमूद केली आहे. येथेच तपासणी सुरू केल्यास भाविकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.हज यात्रेची वैद्यकीय तपासणी ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असून विलंब झाल्यास अनेक भाविक यात्रेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यास तातडीने ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक आयडी व पासवर्ड स्वारातीला उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ववत पद्धतीने तपासणी सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

COMMENTS