Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दानशूर व सशुल्क दर्शन आरती घेणार्‍या साईभक्तांना लाडु प्रसाद पाकीट सुरू करा ः साईराज गायकवाड 

शिर्डी प्रतिनिधी ः श्रद्धा व सबुरीचा मंत्र देणार्‍या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून काही कोट्यावधी साईभक्त वर्षाकाठी भेट देत

गिगाबाईट कॉम्प्युटर केडगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा 
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता नागरिकांच्या जीवाशी खेळl पहा LokNews24
पोलिसांनी नोंदवला डॉ. पोखरणांचा जबाब

शिर्डी प्रतिनिधी ः श्रद्धा व सबुरीचा मंत्र देणार्‍या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून काही कोट्यावधी साईभक्त वर्षाकाठी भेट देत असतात. त्यात साई भक्तांबरोबरच दानशूर सशुल्क आरती व दर्शन घेणारे साईभक्त देखील मोठ्या प्रमाणावर असतात. यात दानशूर साईभक्तांचा  सत्कार देखील केला जातो. मात्र या माध्यमातून कोट्यवधी रुपये देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थान कडे जमा होतात. अशावेळी  तिरुपती  बालाजी देवस्थानच्या  धर्तीवर  लाडु प्रसाद  देउन साईबाबा संस्थानने सन्मान करावा अशी मागणी शिर्डी येथील  साई नाईन ग्रुपचे संचालक व साईबाबांच्या समकालीन भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे पणतू साईराज गायकवाड पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेट घेऊन केली असून याबाबत साईभक्तांचा सन्मान करण्यासाठी शासन वचनबद्ध असून यासाठी विधी व न्याय खात्यासह साईबाबा संस्थानच्या त्रिस्तरीय समितीला सुचना करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल  असे आश्‍वासन  देण्यात आले आहे.अशी माहिती साईराज गायकवाड पाटील यांनी दिली आहे.
  शिर्डीत मोठ्या प्रमाणावर साईभक्त येत असतात. त्यात दानशूर व सशुल्क पेड दर्शन आरती घेणारे साईभक्त देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे बाबांच्या दानपेटीत दान देखील मोठ्या प्रमाणावर वाढते आहे हे पुढे आले असताना अशा साईभक्तांचा सन्मान करण्यासाठी साईबाबा संस्थान पास घेतेवेळी या साई भक्तांना लाडू प्रसाद  देऊन पास वितरित करावा यामुळे शिर्डीत येणार्‍या साई भक्तांना तिरुपती देवस्थानच्या धर्तीवरचा हा उपक्रम जलद गतीने सुरू केल्यास आणखी दानपेटी मध्ये दान वाढण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळणार असून त्यामुळे साईबाबा संस्थानला देखील विविध विकास कामांसाठी  मोठ्या प्रमाणात दानराशी उपलब्ध होणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थान साईभक्त हितासाठी भोजन,आरोग्य निवास, वैद्यकीय सुविधा, आदींसह विविध उपक्रम राबवत असते.त्यामुळे या सर्व धर्तीवर या नवीन उपक्रमाची सुरुवात त्वरित सुरू करावी अशी मागणी केली असून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे साहेब यांनी देखील याबाबतीत साईबाबा संस्थान लगतच्या काळात सकारात्मक विचार करेल असे सांगितले आहे.

COMMENTS