Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात टँकरसह चारा छावण्या सुरू करा

काँगे्रस नेते नाना पटोले यांची मागणी

मुंबई ः राज्यातील लोकसभा निवडणुका आता संपल्याअसून सरकारने आता दुष्काळ निवारण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यातील बहुतांश भागात पाणीटंचाईचा मोठा

उदय सामंत यांना जाळून ठार मारू
मुख्यमंत्र्यांना चेष्टा-मस्करी करण्याची सवय… नाना पटोलेंची मिश्किल प्रतिक्रिया
परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई ः राज्यातील लोकसभा निवडणुका आता संपल्याअसून सरकारने आता दुष्काळ निवारण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यातील बहुतांश भागात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. धरणातील पाणीसाठा जेमतेम असून हजारो गावांना, वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाई असलेल्या प्रत्येक गावखेड्यात पिण्याचे पाणी मिळावे तसेच जनावरांना चारा उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी आचारसंहिता शिथिल करुन तातडीन राज्यात टँकरसह चारा छावण्या सुरू करण्याची मागणी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना ोले म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी माता भगिनी भर उन्हात वणवण करत आहेत. जनावरांना चारा नाही. अनेक शहरांत 10-12 दिवसांतून एकदा पाणी येते. राज्यातील 23 जिल्ह्यांत पाण्याची भीषण टंचाई असल्याचे समजते. मराठवाड्यातील परिस्थिती तर अत्यंत गंभीर आहे. चारा नसल्याने दुध उत्पादक शेतकर्‍यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्याला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलावीत हे आम्ही 4 महिन्यांपूर्वी सांगितले होते, पण राज्यातील भाजपा-शिंदे-अजित पवार यांचे सरकार आपसातील कुरघोड्या व दुसरे पक्ष फोडणे यातच व्यस्त असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणुकीमुळे शासन व प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिले आता राज्यातील निवडणूक कार्यक्रम संपला आहे. राज्य सरकारने तातडीने पाणी व चार्‍याची सोय करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

COMMENTS