Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

15 दिवसांत कारखाना सुरु करा : मदन भोसले यांचे नूतन संचालकांना आवाहन

मदन भोसले खंडाळा / प्रतिनिधी : खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता किसन वीर बरोबर असलेला भागिदारी क

सडा वाघापूरजवळ अल्टो कार तीनशे फूट दरीत कोसळली : एकजण जखमी
गौतम अदानींबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे : आ. पृथ्वीराज चव्हाण
पश्‍चिम महाराष्ट्रातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित; 5 लाख 60 हजार ग्राहकांना पुनर्वीज जोडणी संधी
मदन भोसले

खंडाळा / प्रतिनिधी : खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता किसन वीर बरोबर असलेला भागिदारी करार आठ दिवसात दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत. हा कारखाना येणार्‍या 15 दिवसात सुरु करावा, असे आवाहन आमदार यांच्या नेतृत्वाखालील निवडुन आलेल्या सत्ताधारींना किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकार परिषेदत केले. दरम्यान करखान्याच्या निवडणूकीत सर्व उमेदवारांच्या पराभवानंतर मदन भोसले काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मदन भोसले यांनी कारखाना उभा करण्यासाठी मदत करण्याची भुमिका येथे मांडली.
यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक सी. व्ही. काळे, राहुल घाडगे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, सचिन सांळुखे, प्रविण जगताप, प्रताप यादव व किसन वीर कारखान्याचे संचालक, चंद्रकांत यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.
मदन भोसले म्हणाले, नवनिर्वाचित सत्ताधारी यांना हवी ती मदत करायला तयार आहे. आम्ही शेतकर्‍यांसाठी हा कारखाना जिवाचे रान करुन उभा केला आहे. म्हणून कोणालाही याचे आडीट करायचा अधिकार नाही. हिशोब मागता काय, कारखाना उभारणीस का धावुन आला नाही, असे प्रश्‍न विचारण्यापेक्षा उभा केलेला कारखाना 15 दिवसात सुरु करा. यासाठी भागिदारीचा 18 वर्षाचा करार आठ दिवसात तडजोड करायला तयार आहे.
आपणास उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच जिल्हा मध्यवती बँकेची सुध्दा साथ आहे. म्हणून करार मोडायला वर्षभर लागणार नाही. सर्व मदत करायला तयार आहे. मात्र, स्वतःच्या जमीनी तारण ठेवणार्‍या संचालकांना वार्‍यावर सोडू नका, अशी अपेक्षा व्यक्त केली.
खंडाळा कारखाना निवडणुकीत आलो नाही याबद्दल बोलताना भोसले म्हणाले, खंडाळ्याच्या राजकारणात मी ढवळाढवळ करत नाही. तसेच मला बोलविण्यातही आले नाही. यावर गाढवे सरांना विचारा. जिवाचा रान करुन हा कारखाना उभा केला. यासाठी खुप यातना सोसल्या आहेत. म्हणून माझ्या कामाचे आडिट करु नका, यावेळी कोणीही ईकडे फिरकले सुध्दा नाही. तरी याविषयावर बोलण्यापेक्षा हा कारखाना त्वरीत सुरु करावा. एवढीच माफक अपेक्षा मदन भोसले यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
प्रारंभी नूतन संचालकांचे आभार मानताना शंकरराव गाढवे म्हणाले, शेतकर्‍यांसाठी हा कारखाना उभा केला. यासाठी मदनदादाचे सहकार्य मिळाले. सहकारातला हा शेवटचा असणारा कारखाना सहकारीच राहवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS