एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम ; संपाचा तिढा कायम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम ; संपाचा तिढा कायम

मुंबई :राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात भरघोस वाढ केल्यानंतर आता तरी कर्मचारी संप मागे घेेऊन कामावर हजर होतील ही अपेक्षा होती. मात्र राज्य

मुंबईत कांजूरमार्गमधील आगीत पाच महिला जखमी
खडकवासलातून 22 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
सुनील गावसकरांनी घेतला धोनीचा ऍटोग्राफ

मुंबई :राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात भरघोस वाढ केल्यानंतर आता तरी कर्मचारी संप मागे घेेऊन कामावर हजर होतील ही अपेक्षा होती. मात्र राज्य सरकारने अल्पशी वेतनवाढ करून कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असून, जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोरील अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
एसटी कर्मचारी आणि त्यांचं नेतृत्व करणार्‍यांमध्ये फूट पडलेली स्पष्ट दिसते आहे. कारण, भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यावेळेस त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकरही होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचे की बंद करायचे याचा निर्णय कर्मचार्‍यांनी घ्यायचा आहे असंही खोत, पडळकर म्हणालेत. पडळकर आणि खोत यांनी संपातून माघार घेतली तरी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलतांना खोत म्हणाले की, हे जे आंदोलन आहे ते राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केले होते. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचार्‍यांची होती. सरकारने याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचार्‍यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. सरकार कामगारांकडे लक्ष देत नव्हतं त्यामुळं आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसलो. 15 दिवसानंतर सरकारला जाग आली. न्यायालयीन लढा वकील लढत आहेत. न्यायालयीन लढा होईपर्यंत सरकारनं तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला. हा पहिला टप्पा आहे. 17 हजार पगार मिळणार्‍या कामगारांना 24 हजारांवर गेला आहे. ज्या कामगारांना 23 हजार मिळत होता त्यांना 28 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. ही वाढ मूळ वेतनात होणार आहे. हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे, असे खोत म्हणाले.

एसटी आंदोलनाच्या नेतृत्वात फूट
एसटी आंदोलनाच्या नेतृत्वात फूट पडल्याचे अखेर गुरुवारी स्पष्ट झाले. मुंबईतल्या आझाद मैदानातून आंदोलनातून काढता पाय घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर तात्काळ काही मिनिटांध्ये अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले. या दोघांनाही आंदोलनातून आझाद केले आहे. आता विलीनीकरणासाठी आंदोलन डंके की चोट पे असल्याचा इशाराही त्यांनी दिला.आझाद मैदानावर सुरू असलेले एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन अखेर चिघळले असून, त्यात दुही माजल्याचेही गुरुवारी स्पष्ट झाले. तात्काळ या आंदोलनाचे नेतृत्व आता अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे दिसले.

COMMENTS