क्षुल्लक कारणावरुन एसटी ड्रायव्हर आणि कंटक्टरला जबर मारहाण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्षुल्लक कारणावरुन एसटी ड्रायव्हर आणि कंटक्टरला जबर मारहाण.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

रायगड प्रतिनिधी- रोवळा-वाशी एसटी बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना बोरभाट बस स्टॉपजवळ काही नागरिकांनी त्यांना जबर मारहाण केली. बस ड्रायव्हर सचिन जंग

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या 14 मिनिटं आधी सुसाट कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एकाची आत्महत्या
ठाण्यात स्फोटकं सापडल्याने घातपाताचा संशय

रायगड प्रतिनिधी- रोवळा-वाशी एसटी बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना बोरभाट बस स्टॉपजवळ काही नागरिकांनी त्यांना जबर मारहाण केली. बस ड्रायव्हर सचिन जंगम व कंडक्टर सुनिल शेडगे हे तळा – वाशी गाडी घेऊन जात असताना तळे येथे 2 उन्मत्त आणि मद्यपी प्रवाशांनी गाडीला हात करून थांबण्याचा इशारा केला. मात्र जागेअभावी चालकाने गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली व पुढे येण्याची विनंती केली. या शुल्लक गोष्टीचा राग मनात धरून दोघांपैकी एकाने दरवाज्यात उभ्या असलेल्या वाहकाला कॉलर धरून मारहाण केली व तो निघून गेला. ही बस परत येत असताना याच इसमाने आदीवासी वाडीतील जमाव एकत्र करून रस्त्यावर मोटार सायकली आडव्या घालत एसटीचा रस्ता अडवला आणि चालक व वाहक यांना जबरी मारहाण केली. यात पुरुषांसह महिलादेखील आघाडीवर होत्या. वाहक सुनील शेडगे यांनी याबाबत तळा पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS