अमरावतीच्या चांदूर रेल्वेत SRK चे जबरा फॅन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीच्या चांदूर रेल्वेत SRK चे जबरा फॅन

"पठाण" सिनेमाचा पहिला शो पाहण्यासाठी केलं अख्खा थिएटर बुक

अमरावती प्रतिनिधी - भगव्या बिकिनीमुळे चर्चेत आलेला शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाउसफुल होताना दिसत आहे. शाहरुखच्या अमरावती जि

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ८ हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित
पोलिस पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू तस्करांना विविध कलमान्वये शिक्षा 
पिंपरी निर्मळ येथील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा

अमरावती प्रतिनिधी – भगव्या बिकिनीमुळे चर्चेत आलेला शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाउसफुल होताना दिसत आहे. शाहरुखच्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतीन चाहत्यांनी चक्क अख्ख थिएटर बुक केले आहे. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. पठाण’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या या जबरा फॅनने ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलं आहे. अमरावतीमधील एसआरके फॅनक्लबने थिएटरचं बुक केलं आहे. या फॅन क्बलचा फाऊंडर चांदूर रेल्वे शहरातील आशिष उके हा आहे. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी आज सकाळी ९ ते १२ वाजताचा शो बुक केला आहे. यामध्ये उके यांनी 270 तिकीट विकत घेतल्या आहेत.

COMMENTS