Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ नाशिकला श्रीराम कथा महोत्सव 

महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन..

नाशिक प्रतिनिधी -  कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचा शंखनाद नाशिक येथील क

सर्वेक्षणाला दांडी मारणार्‍या 130 कर्मचार्‍यांना नोटीसा
थोरात कारखान्यास ऊस विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
रेखा जरे हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.| माझं गावं माझी बातमी | LokNews24 |

नाशिक प्रतिनिधी –  कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचा शंखनाद नाशिक येथील कुंभमेळा मैदानावर होणार आहे.जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून त्यात प्रामुख्याने १७ डिसेंबर पासून रोज दुपारी १२ ते ३ वाजे दरम्यान प्रसिद्ध कथाकार श्री समाधान महाराज शर्मा यांच्या मधुर वाणीतुन श्रीराम कथा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भविकांनी श्रीराम कथेचा व  धर्म सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

        कठोर तपस्वी,निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचा ३४ वा पुण्यस्मरण सोहळा नाशिक शहरातील कुंभमेळा मैदानावर १७ ते २४ डिसेंबर दरम्यान संपन्न होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून जगदगुरू बाबाजींचे उत्तराधिकारी अनंत विभूषित समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थिती या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्या दरम्यान  रोज दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान प्रसिद्ध कथाकार पूज्यश्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या मधुर वाणीतुन श्रीराम कथा  होणार आहे.तसेच महाजपानुष्ठान, १०८ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ,   अखंड नंदादीप,हस्त लिखित  नामजप, नामसंकीर्तन,अभिषेक,भागवत पारायण,श्रमदान आदी विविध धार्मिक उपक्रम संपन्न होणार आहे. रोज पहाटे ५ वाजता अमृततुल्य नित्यनियम विधी,भागवत वाचन,ध्यान प्राणायाम,सत्संग,प्रवचन संपन्न होणार आहे.भविकांनी या भव्य-दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे अवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS