Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवरात्रोत्सवानिमित्त समता स्कूच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त ’गरबा व दांडिया नृत्य स्पर्धा’ अनोख्या अशा आगळ्या - वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोज

मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले तालुकाध्यक्षपदी गणेश आवारी
केडगाव येथे जावयाकडून सासू सासरे व पत्नीस बेदम मारहाण
विद्यार्थ्यांना होणार मोफत शालेय साहित्य वाटप

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त ’गरबा व दांडिया नृत्य स्पर्धा’ अनोख्या अशा आगळ्या – वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास कोपरगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून गरबा व दांडियात उत्कृष्ट कला – गुण सादर करत कोपरगावकरांनी भरघोस बक्षिसांची लयलूट करत आनंद घेतला. या स्पर्धेत कोपरगाव शहर व तालुक्यातील वैयक्तिक व सांघिक असे 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धांचे परीक्षक म्हणून वर्षा कोटक, रूपाली भट यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात कोपरगाव तालुक्यासह शिर्डी, श्रीरामपूर, वैजापूर, येवला येथील स्पर्धकही सहभागी झाले होते.
 सांघिक प्रकारात अनुप पटेल अँड ग्रुप (कोपरगाव), बाकलीवाल अँड ग्रुप (कोपरगाव), नूतन लाहोटी अँड ग्रुप (कोपरगाव), पायल भालेराव अँड पायल ब्युटी पार्लर ग्रुप (शिर्डी) यांना सन्मान चिन्ह, सहभाग प्रमाणपत्र आणि बक्षिसे देण्यात आली. वैयक्तिक प्रकारात उत्कृष्ट पोषाखात कशिश शर्मा व दिव्या शर्मा, उत्कृष्ट हावभावात कशिश शर्मा व युगांत रोडे, उत्कृष्ट जोडीत शर्मिला कामतकर व आराध्या कामतकर आणि दिव्या शर्मा व अक्षरा शर्मा, उत्कृष्ट समन्वयात वनिता मल्ला व इमली प्रिया, उत्कृष्ट नवीन नृत्यकलेत नूतन लाहोटी व कशिश शर्मा आणि आराध्या कामतकर, उत्कृष्ट मेकअपमध्ये अक्षरा शर्मा व प्रिया अजमेरा यांनी गरबा व दांडिया यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह, विविध बक्षिसे मिळविली तर दांडिया किंगचा मुकुट अनुप पटेल आणि दांडिया क्वीनचा मुकुट प्रियंका आर्य यांनी मिळवत अनेक बक्षिसांची लयलूट केली. या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या  मंगला शहा उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, केवळ शालेय पुस्तकातील  ज्ञान व माहिती न घेता भारतीय संस्कार व संस्कृतीची माहिती व ज्ञान असायला हवे. भारतीय सण उत्सवांमधून भारतीय संस्कृतीचे जतन होत असते. त्यामुळे नवरात्र उत्सवात धार्मिकतेबरोबरच दांडिया, गरबाची कला सादर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. तसेच नवरात्रोत्सव हा माँ दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित आहे. या काळात भक्त देवीची मनोभावे पुजा-प्रार्थना करतात. सर्वत्र उत्साह व जल्लोषाचे वातावरण पसरलेले असते. समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, माता-पालक यांच्या एकत्रित दांडिया व गरबाच्या नृत्याविष्काराने या नवरात्रौत्सवाची सुरुवात झाली. तत्पूर्वी समता इंटरनॅशनल स्कूलचा इ 8 वीतील विद्यार्थी प्रणव गायकवाड याने गरबा व दांडियाच्या तालावर गणेश वंदना सादर केली. प्रमुख पाहुण्या मंगला शहा, समता स्कूलचे मुख्य कार्यवाह संदीप कोयटे, आस्वाद मेस विभागाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्या नंतर समता इंटरनॅशनल स्कूलच्या  कार्यकारी विश्‍वस्त  स्वाती संदीप कोयटे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या  मंगला शहा यांचा सत्कार करण्यात आला तर परिचय समता स्कूलचे उपप्राचार्य समीर अत्तार यांनी करून दिला.  जोत्सना पटेल, सिमरन खुबानी, शालिनी खुबाणी,  प्रियंका सोनेकर, भारती गोयल, शुभम सोनेकर आदींनी आयोजकांची भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्या  हर्षलता शर्मा, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शिक्षिका श्‍वेता सदाफळ यांनी मानले.

COMMENTS