Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटारीच्या नंबरच्या हौसेपायी लाखोंचा खर्च

मोटारीचा 9 क्रमांक ठरला सर्वांत महागडा

पुणे/प्रतिनिधी : कुणाला कशाची हौस असेल सांगता येत नाही. हौसेला मोल नसतात असे नेहमीच म्हटले जाते, कारण त्या हौसेपायी कितीही पैसे मोजण्याची तयारी स

मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे…
नुपूर शर्मा आणि देशातील बुद्धिजीवी !
आजीचा खून करुन नातवाने रचला घसरुन पडल्याचा बनाव | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी : कुणाला कशाची हौस असेल सांगता येत नाही. हौसेला मोल नसतात असे नेहमीच म्हटले जाते, कारण त्या हौसेपायी कितीही पैसे मोजण्याची तयारी समोरच्याची असते. तसाच काहीसा प्रत्यय पुण्यात बघायला मिळाला आहे. पुण्यात 9 क्रमांकांसाठी सर्वाधिक बोली लावण्यात समोर आले आहे. एका व्यक्तीने या क्रमांकासाठी 4 लाख 11 हजार रुपये खर्च केले आहेत.
अनेकजण मोटारींना आवडीचा क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत. मोटारींसाठीच्या नवीन क्रमांकाच्या मालिकेत लिलावात लाखोंची बोली लावून आकर्षक क्रमांकाची अनेकांनी खरेदी केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) झालेल्या लिलावात 9 क्रमांकाला सर्वाधिक बोली लावण्यात आली. आरटीओकडून दुचाकी अथवा मोटारींसाठी नवीन क्रमांकांची मालिका सुरू करण्याआधी त्यातील आकर्षक क्रमांकांची विक्री केली जाते. त्यासाठी क्रमांकानुसार 15 हजार रुपये ते 4 लाख रुपये शुल्क असते. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकांचा लिलाव केला जातो. त्यात जास्त बोली लावणार्‍यास तो क्रमांक दिला जातो. हा लिलाव नुकताच आरटीओमध्ये झाला. या लिलावात 9 क्रमांकाला सर्वाधिक 2 लाख 61 हजार रुपयांची बोली लावण्यात आली. या क्रमांकासाठी 1 लाख 50 हजार रुपयांचे शुल्क असून, मोटार मालकाला यासाठी एकूण 4 लाख 11 हजार रुपये भरावे लागले. एक क्रमांकाला चार लाख रुपयांचे शुल्क आहे. या क्रमांकासाठी एकच अर्ज आल्याने हा क्रमांक त्या मोटारमालकाला तेवढ्याच शुल्कात मिळाला. त्यानंतर 9999 या क्रमांकासाठी 70 हजार रुपयांची बोली लावण्यात आली. या क्रमांकासाठी 1 लाख 50 हजार रुपयांचे शुल्क असल्याने मोटारलमालकाला एकूण 2 लाख 20 हजार रुपये भरावे लागले, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

COMMENTS