Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तपासाची चक्रे वेगाने फिरवत, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा : विवेक कोल्हे

कोपरगाव : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सचिन वॉच या प्रतिष्ठित घड्याळ दुकानात दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाली असून, लाखो रुप

नवीन मुजामपेट येथील पंधरा लाखाचा रस्ता दोन लाखात बनविला
रयतच्या शाळांतून एआय तंत्रज्ञान शिकविणार : खा. शरद पवार
23 रोजी नांदेड येथे  सर्वधर्मीय सामुहिकविवाह मेळावा 
Displaying IMG-20250420-WA0045.jpg

कोपरगाव : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सचिन वॉच या प्रतिष्ठित घड्याळ दुकानात दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाली असून, लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकारामुळे कोपरगावच्या व्यापारजगतात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.या दुर्दैवी घटनेनंतर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी सचिन वॉचचे मालक संजयशेठ लोहाडे यांच्या दुकानाला आणि निवासस्थानी जाऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, पोलीस प्रशासनाकडे आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यावेळी संपूर्ण कोपरगावकर व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.पहाटेच्या दरम्यान ही चोरी घडली असून, दोन दिवस उलटूनही आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे पोलिसांनी कठोर पद्धतीने तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवावी.

मागील काही काळात कोपरगावमध्ये सातत्याने चोरी, अवैध धंदे, हाणामाऱ्या, गोळीबार, जातीय तेढ यांसारख्या गंभीर घटनांचे प्रमाण वाढले आहे. पण यावर अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मागील दोन-तीन वर्षांतील अनेक गुन्हे अजूनही उघडकीस आलेले नाहीत त्यावर देखील काम करणे अपेक्षित आहे.कोपरगावची बाजारपेठ फुलवण्यासाठी सर्वच व्यापारी प्रयत्नशील आहेत. मात्र अशा घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि नैराश्याचे वातावरण निर्माण होत आहे. याचा प्रत्यक्ष फटका संपूर्ण शहराच्या विकासावर होऊ शकतो.सचिन वॉच येथे झालेल्या चोरीप्रकरणी तातडीने आणि प्रभावी कारवाई व्हावी त्यामुळे नागरिकांना कायदा सुव्यवस्थेचा आधार वाढेल.

यावेळी प्रतिक्रिया देताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले मा आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी देखील पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेबांशी चर्चा करून या गुन्ह्यातील आरोपी पकडले जाण्यासाठी विशेष लक्ष घालण्याची चर्चा केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मागील कार्यकाळात त्यांनी कोपरगावसाठी दोन स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्मिती करून दिली आहे. कार्यक्षेत्र मोठे आहे त्यामुळे सध्या पोलिसबळ कमी पडते त्यासाठी अतिरिक्त पोलीस बळ मिळावे यासाठी पत्रव्यवहार देखील कोल्हे ताईंनी केलेला आहे.

स्थानिक पोलिस प्रशासनाने तत्परतेने या गंभीर घटनेकडे लक्ष देऊन, लवकरात लवकर आरोपींना अटक करावी. गुन्हे घडणार नाहीत यासाठी गस्त वाढवावी ही सर्व कोपरगाववासियांची मागणी आहे यावर पोलिसांनी गांभीर्याने कार्यवाही करावी असेही शेवटी कोल्हे म्हणाले.या प्रसंगी श्री संजयशेठ लोहाडे,अतुलशेठ काले,अनिलशेठ कासलीवाल, पप्पूशेठ पडियार,रंजन जाधव,शिखरचंद लोहाडे,अमित लोहाडे यासह लोहाडे कुटुंबीय उपस्थित होते.

COMMENTS