Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जात पडताळणी समितीची आजपासून विशेष त्रुटी पुर्तता मोहिम

सातारा / प्रतिनिधी : माहे जून 2024 पासून आजअखेर ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांंनी समितीकडे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. परंतू अद्य

इस्लामपुरात पंतप्रधानांनी साधला नव मतदारांशी ऑनलाईन संवाद
अवघ्या दहा तासात मोटरसायकल चोरास अटक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा / प्रतिनिधी : माहे जून 2024 पासून आजअखेर ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांंनी समितीकडे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. परंतू अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अथवा ज्या अर्जदारांचे प्रकरण त्रुटी आहेत, अशा सर्व प्रवर्गातील विद्यार्थी, अर्जदारांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा या कार्यालयात दि. 14 ते दि. 28 नोव्हेंबर दरम्यान कार्यालयीन कामकजाचे दिवशी सर्व आवश्यक मुळ व प्रमाणित कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या प्रकरणी त्रुटीची पुर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती रविंद्र कदम यांनी केले आहे.
त्रुटींची माहिती ई-मेलने : जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदार यांच्यास्तरावर प्रलंबित आहे. संबंधित अर्जदारांना ई-मेलवर त्रुटी कळवल्या आहेत. त्यांची पूर्तता न झाल्याने ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांना त्रूटीपुर्तता व मूळ कागदपत्रांसह दि. 14 ते दि. 28 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3.30 या वेळेत समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटींची पुर्तता करून घ्यावी.

COMMENTS