बुलढाणा : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत

बुलढाणा : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष जात प्रमाणपत्र पडताळणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आणि इतर अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून देणे हा मोहिमेचा उद्देश आहे. 1 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सन 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिली जातील. उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असल्याने, कोणत्याही विद्यार्थ्याला या प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 11 वी 12 वी विज्ञान व डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील सन 2025-26 मधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेचा ई-मेल आलेला आहेत, त्यांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून पुर्तता करुन या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.
COMMENTS