Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कुत्रे भगाव विशेष मोहीम

कुत्रे हाकलण्यासाठी नगर पालिकेचे 15 कर्मचारी तैनात

बुलडाणा प्रतिनिधी - बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याची बाबा प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच

प्रकाश कामगारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग; पोलिसासह आरोग्य अधिकार्‍यांच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात उपोषण
 नवी मुंबई मध्ये 2 श्वानांचे लग्न
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी : डॉ. नीलम गोर्‍हे यांचे आवाहन

बुलडाणा प्रतिनिधी – बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याची बाबा प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या लक्षात आली आहे. बुलडाणा नगर पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील कुत्रे हाकलण्यासाठी तब्बल 15 कर्मचारी तैनात केले आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.एच.पी.तूम्मोड एक महिन्याच्या प्रशिक्षणाला मसुरीला गेल्यामुळे बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार 8 मे रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी स्विकारला आहे.त्या आता दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे त्यांना दिसून आले.या बाबत त्यांनी न प चे मुख्याधिकारी गणेश पांडे यांना सांगितले असता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मोकाट कुत्रे हकालण्यासाठी 17 मे पासून नगरपालिकेचे 15 सफाई कामगारांची ड्युटी लावण्यात आली आहे.हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूर्ण परिसरात फिरून मोकाट कुत्र्यांना बाहेर काढत असल्याचे दिसून आले.

COMMENTS