नायगाव प्रतिनिधी - नायगाव तालुक्यातील धनंज येथील शेतकरी बालाजी अर्जुन हंबर्डे ,बाबजी गोविंदा जाधव ,देवराव चंदर सूर्यवंशी ,उत्तमराव बाबजी ढगे यांच
नायगाव प्रतिनिधी – नायगाव तालुक्यातील धनंज येथील शेतकरी बालाजी अर्जुन हंबर्डे ,बाबजी गोविंदा जाधव ,देवराव चंदर सूर्यवंशी ,उत्तमराव बाबजी ढगे यांच्या शेतातील 7 एकर मधील एक महिण्याखाली पेरणी केलेले सोयाबीन पीक अचानक करपून गेले त्यामुळे या चार शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शेतीची पेरणी योग्य मशागत केल्यामुळे पोषक वातावरणामुळे सोयाबीन पिकाची अंदाजे फुटांपर्यंत जोमदार वाढ झाली. सोयाबीन पिके चांगली डोलत असताना अचानक एकाच आठवड्यात संपूर्ण सोयाबीन पीक एकदम करपून गेले. त्यामुळे शेती उत्पादनाचे बालाजी हंबर्डे यांचे स्वप्न भंग पावले. या प्रकाराने शेतकरी हंबर्डे चिंताक्रांत झाला आहे. त्यांनी या बाबतीत पत्रकार माधव धडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी तालुका कृषी अधिकारी वरपुडे याना सोयाबीन नुकसानी संदर्भात दूरध्वनीवरून योग्य ती माहिती दिली, त्यामुळे तालुका कृषी अधिकारी वरपुडे यांनी तात्काळ नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी साहाय्यक याना गुरुवारी तुमच्या गावात पाठविणार असल्याचे सांगितले आहे.
नायगाव तालुक्यातील धनंज येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी अर्जुन हंबर्डे यांचा गट क्रमांक 112 मधील क्षेत्र 2.हे 0.34 आर जमिनीपैकी 80 आर जमिनी मधील सोयाबीन अक्षरशः उध्वस्त झाले आहे. बालाजी हंबर्डे यांनी पेरणी करण्यासाठी बूस्टर फोंडिशन कंपनीचे सोयाबीन दोन पॉकेट ज्याची किंमत 7200 रुपये तर खत तीन पॉकेट कोरोमंडल कंपनीचे डीएपी किंमत 3900 ,सल्फर तीन पॉकेट ज्याची किंमत 1650 रुपये तर शेती पेरणी व मशागत करण्यासाठी 7000 हजार रुपये ,तर खुरपणी व कोळपणी 5000 हजार रुपये तर सोयाबीन पिक लाल पडल्यामुळे फवारणीसाठी औषधी रुपये 1100 रुपये एकूण अंदाजित खर्च 25850 रुपये खर्च करण्यात आले तर या खरीप हंगामाचे एकूण उत्पन्न दिड लाखाच्या जवळपास होत होते मात्र सोयाबीन पिकावर अतिपावसामुळे कोणता रोग पडला माहिती नाही मात्र बालाजी हंबर्डे, बाबजी जाधव , देवराव सूर्यवंशी , उत्तमराव ढगे आदी शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बालाजी हंबर्डे यांच्या मुलींचे लग्न झाले आहे, त्यांच्या मुलीची डिलिव्हरी सिझरिंग करण्यासाठी 80,000 हजार रुपये खर्च करण्यात आला.त्यातल्या त्यात दोन मुलाचे शिक्षण यांच्यावर कुठून खर्च करायचा हा मोठा प्रश्न हंबर्डे यांच्या समोर निर्माण झाला आहे. हंबर्डे यांनी शेत पेरणी करण्यासाठी व लग्नासाठी एच.डी. एफ.सी बँकेकडून 3 लक्ष 80 हजार रुपये कर्ज काढून व्यवव्हर केला आहे.तर एस.बी.आय.बँके कडून पीक कर्ज घेतले आहे. सदर बँकेचे कर्ज कशाने फेडावे हा मोठा प्रश्न शेतकर्यां समोर उभा टाकला आहे..बँकेचे कर्ज कशाने परत फेड करावे म्हणवून शेतकर्यांन समोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही.करीता संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन नुकसान ग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचा तात्काळ पंचनामा करून संबंधित विभागाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
4 शेतकर्यांचे अतोनात नुकसान-बालाजी हंबर्डे गट क्रमांक 112 मधील क्षेत्र 2.हे 0.34 आर जमिनीपैकी 80 आर जमिनी मधील सोयाबीन अक्षरशः उध्वस्त झाले तर बाबजी गिविंदा जाधव यांचा गट क्रमांक 71 मधील क्षेत्र 0.हे.80 आर जमिनीमधील सोयाबीन करपून गेले तर देवराव चंदर सूर्यवंशी यांचा गट.क्रमांक 56 मधील क्षेत्र 01 हे.20 आर जमिनीमधील सोयाबीन अक्षरशः करपून गेले असून उत्तमराव बाबजी ढगे यांचा गट क्रमांक 303 मधील 0.61 आर मधील सोयाबीनचे पिके करपून गेले त्यामुळे आम्हा सर्व शेतकर्यांच्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून आम्हास नुकसानभरपाई द्यावी.अशी मागणी शेतकर्याकडून,होत आहे.
COMMENTS