Homeताज्या बातम्यामनोरंजन

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न ?

सध्या मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. सध्या साउथची अभिनेत्री साई पल्लवी ही देखील गुपचूप लग्न केल्याच

बायकोने घेतला नवऱ्याचा मोबाईल… रागाच्या भरात नवऱ्याने चिरला बायकोचा गळा
लोकानुनयाचा उदय
जावयाकडून राहत्या घरी सासूची हत्या | DAINIK LOKMNTHAN

सध्या मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. सध्या साउथची अभिनेत्री साई पल्लवी ही देखील गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच साई पल्लवी ही कायम चर्चेत असते. साई पल्लवीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ती सोशल मीडियावर कमी सक्रिय असली तरी तिच्या पोस्टची कायमच जोरदार चर्चा रंगत असल्याचे बघायला मिळत असते. साई आपल्या साधेपणासाठी आणि उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या साईचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये ती वधुच्या वेशात बघायला मिळत आहे. यामुळे तिने लग्न केल्याच्या बातम्या सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. या फोटोमध्ये साई पल्लवी एका व्यक्तीसोबत बघायला मिळत आहे. त्यांच्या गळ्यामध्ये फुलांचा हार आहे. जणू त्यांनी वरमाला घातले असल्याचे दिसत आहे. या फोटोमुळे साई पल्लवीने लग्न केल्याची चर्चा सध्या रंगत आहे. अनेकांनी तिच्या त्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परंतु हा फोटो तिच्या लग्नाचा नसून एका सिनेमाच्या शुटिंगच्या मुहूर्ताचा असल्याचे सांगितले जात आहे.

या फोटोत साई पल्लवीबरोबर तिचे सहकलाकार सिवा कार्तिकेयन बघायला मिळत आहेत. तसेच हा फोटो ‘एस के 21’ या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान काढला असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमा दिग्दर्शक राजकुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्याबरोबर सहकलाकार शिवकार्तिकेयन बघायला मिळत आहे. यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. साईने लग्न केलं नाही हे ऐकून चाहते देखील पुन्हा एकदा खुश झाल्याचे दिसत आहे. साईने दाक्षिणात्य सिनेमामध्ये स्वतःचं एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे.

COMMENTS