मुंबई ः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे राष

मुंबई ः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ आता युवती विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा होती. आता मुंबईत सोमवारी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
COMMENTS