Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात गीत गायन स्पर्धा उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील ’श्रेष्ठ नागरिक संघटना ’ व  ’वनिता महिला मंडळ ’ तसेच  ’जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, नुकत्याच

नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला पंधरा दिवसात चार जणांचा बळी
राष्ट्रपतींच्या दौ-यात दोघांचा बळी l DAINIK LOKMNTHAN
सिव्हिलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील ’श्रेष्ठ नागरिक संघटना ’ व  ’वनिता महिला मंडळ ’ तसेच  ’जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, नुकत्याच झालेल्या  अयोध्या येथे ’श्रीराम लल्ला ’ प्राणप्रतिष्ठा सोहळा व 75 वा ’प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कोपरगाव शहरात गीत गायन स्पर्धा, मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.
या स्पर्धेत लहान गटासाठी ’देशभक्तीपर गीते’ व मोठ्या गटासाठी  ’भक्ती गीते स्पर्धा ’ आयोजित केली होती या दोन्ही गटासाठी महिलांनी व तरुणींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनिल कुलकर्णी व सुरेखा बिबवे यांनी काम पाहिले. तर यात स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक  प्रियंका लावर द्वितीय क्रमांक अपेक्षा कापडे, तृतीय क्रमांक वैभवी गोरे तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक वृषाली किर्लोस्कर, द्वितीय क्रमांक तारामती डोंगरे , तृतीय क्रमांक संगीता उदावंत तरउत्तेजनार्थ  आशा साळुंके या विजयी झाल्या असून सर्व विजेत्या स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाने संपन्न झालेला कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षा पुष्पलता सुतार व सुधाभाभी ठोळे, तसेच रजनी गुजराती, शैलजा रोहम, वनिता मंडळाच्या अध्यक्षा वंदना चिकटे, शैला लावर, वैदेही किर्लोस्कर, वृषाली किर्लोस्कर, आरती महाजन, हर्षदा पटवर्धन, स्वाती मुळे,  माधवी नेने यांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS