Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनईच्या डॉ. भुषण बिबवे यांचा गौरव

सोनई/प्रतिनिधी : के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे 125 माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक येथे मोठ्या उत्साहात

मृत्यू दाखला हवाय…द्या रोख 600 रुपये ; प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा नगरमध्ये आणखी एक प्रकार
शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कृतज्ञता सप्ताह’
शीतल भागवतची अभियंतापदी निवड

सोनई/प्रतिनिधी : के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे 125 माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये सोनईचे युवा उद्योजक डॉ. भुषण बिबवे यांचा गौरव करण्यात आला.
 सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.  आर.  एस.  माळी, प्रमुख पाहुणे  हिरामण आहेर, डॉ.  व्ही. डी. बर्वे तसेच संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, संस्थेचे विश्‍वस्त मंडळ आणि संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. के के वाघ शिक्षण संस्थेची स्थापना सन 1970 साली नाशिक येथे झाली. आज या संस्थेमध्ये 30 विविध प्रकारची महाविद्यालय व शाळा कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषध निर्माणशास्त्र, कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, ललित कला महाविद्यालय, परफॉर्मिंग आर्ट्स महाविद्यालय, वरिष्ठ तसेच कनिष्ठ महाविद्यालय आणि मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.  तसेच संस्थेमध्ये सध्या सहा विविध प्रकारचे कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय कार्यरत आहेत. संस्थेच्या विविध महाविद्यालयां मधून आतापर्यंत  सुमारे 70,000 हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्यांमधून निवडलेल्या 125 गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम आणि द्वितीय बॅचचे माजी विद्यार्थी युवा उद्योजक संदीप वाघ आणि डॉ. भूषण रत्नाकर बिबवे, शास्त्रज्ञ, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याला केके वाघ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख, निलेश गाडगे, सहाय्यक प्राध्यापक अनिल शिंदे तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS