Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावयाचा सासूवर चाकूने वार

बायकोला उद्या घेवून जा म्हटल्याचा राग

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः सासुरवाडीत पत्नीला नेण्यासाठी आलेल्या जावयाला एक दिवस राहण्यास सांगितले असता तुम्ही     तूमच्या बायकोला उद्या घेऊन जा.

दुचाकी व दूध टँकरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
गोदावरीच्या उजव्या कॅनालमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू
पवार- विखें यांच्यातील राजकीय वैर तिसरी पिढी संपविणार का?

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः सासुरवाडीत पत्नीला नेण्यासाठी आलेल्या जावयाला एक दिवस राहण्यास सांगितले असता तुम्ही     तूमच्या बायकोला उद्या घेऊन जा. असे म्हणाल्याचा राग आल्याने जावयाने त्याच्या पत्नीला मारहाण करून सासूवर चाकूने वार केला. राहुरी तालूक्यातील बारागांव नांदूर येथे घडली आहे. जावयावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की,अबीदा नजीर शेख, वय 55 वर्षे, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी. यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आबीदा शेख यांची मुलगी परजाना हि आठ दिवसापुर्वी बारागांव नांदूर येथे माहेरी आली होती. दिनांक 6 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास आबीदा शेख ह्या मजुरीसाठी शेतात गेल्या होत्या. त्या शेतात काम करीत असताना त्यांची मुलगी जेवणाचा डब्बा घेवुन आली. त्या दोघी शेतामध्ये असताना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आबीदा शेख यांचा जावई अन्वर गणी शेख, (रा. एकता नगर, संगमनेर), हा तेथे आला. आणि त्याची पत्नी परजाना हिस म्हणाला तु आताच माझे बरोबर चल. त्यावेळी आबीदा शेख त्याला म्हणाल्या तुम्ही आज मुक्कामी थांबा, उद्या संगमनेरला जा.असे म्हणाल्याचा त्यास राग आल्याने त्याने त्याची पत्नी परजाना हिस मारहाण करु लागला. भांडण सोडविण्यासाठी आबीदा शेख या मध्ये पडल्या असता  जावायाने पिशवीतील चाकु काढुन आबीदा शेख यांच्यावर वार केला. त्यात त्या जखमी झाल्याने त्यांना अहमदनर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. उपचार घेतल्यानंतर आबीदा शेख यांनी राहुरी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी जावई अन्वर गणी शेख याचे विरुद्ध गुन्हा रजि. नं. 467/2023 भादंवि कलम 323, 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास राहुरीचे पोलीस करीत आहे.

COMMENTS