श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये विधा
श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर दहशतवाद्यांकडून अशांतता पसरवण्यात येत आहे. जम्मू-काश्मिरातील सुंजवान मिलिटरी स्टेशनवर सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.
लष्करी अधिकार्यांनी सांगितले की, लष्करी ठाण्याच्या बाहेर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्नायपर गनमधून गोळीबार केला. जवान जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ड्रोनच्या माध्यमातूनही परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाच दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले होते. यापैकी माछिलमध्ये दोन तर तंगधारमध्ये एक दहशतवादी मारला गेला. 28-29 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा खराब हवामानात माछिल आणि तंगधारमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे लष्कराने सांगितले होते. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी येथे शोध सुरू केला. यादरम्यान चकमक सुरू झाली.
COMMENTS