सोलापूर ः आगामी येऊ घातलेल्या 5 जून रोजी असणार्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने पर्यावरण जनजागृती सप्ताह च
सोलापूर ः आगामी येऊ घातलेल्या 5 जून रोजी असणार्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने पर्यावरण जनजागृती सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवार दिनांक 03 जून 2024 रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या नेतृत्वात विभागीय रेल्वे कार्यालय-सोलापूर रेल्वे स्थानक – विभागीय रेल्वे कार्यालय या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाल प्यासे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटिल, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टिआरडी) अनुभव वार्ष्णेय, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान (आरपीएफ) यांसोबत इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी या सायकल रॅली मध्ये सहभाग घेतला. सहभागी सर्वांच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन आणि त्याचे महत्व याचे संदेश यावेळी देण्यात आले.
COMMENTS