Solapur : महामार्गावरील सक्तीच्या टोल वसुलीविरोधात प्रहारचे आक्रमक आंदोलन… (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : महामार्गावरील सक्तीच्या टोल वसुलीविरोधात प्रहारचे आक्रमक आंदोलन… (Video)

सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील पठाणी टोल वसुलीच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले. संबंधित रस्त्याचे काम हे

आगामी काळात प्रशासकीय, पोलीस व महसूल सेवांमध्ये महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
 शिवशक्ती भीमशक्ती युतीने राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा प्राप्त होणार – डॉ. शिंगणे
सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान

सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील पठाणी टोल वसुलीच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले. संबंधित रस्त्याचे काम हे अजून बऱ्याच ठिकाणी अपुरे असून काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला सुद्धा मिळालेला नाही.

स्थानिक लोकप्रतिनिधीच्या साथीने टोल प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी वसुली करण्याचा घाट घातला आहे. संबंधित टोलवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सामान्य लोकांना त्रास देण्याचा उद्योग सुरू झाला होता. भूमिपुत्रांवर अन्याय करणाऱ्या टोल प्रशासनाच्या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक आंदोलन करत चार तास सलग टोल बंद पाडला.

टोल प्रशासनाने आठ दिवसाची मुदत मागून घेत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संपर्कप्रमुख जमीर शेख, अमर शिरसाट आदींसह प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS