Solapur : अवैध व्यावसायिकांचे मनपरिवर्तन करणाऱ्या पोलिसांचे केले कौतुक (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : अवैध व्यावसायिकांचे मनपरिवर्तन करणाऱ्या पोलिसांचे केले कौतुक (Video)

अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्यांचे ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मन परिवर्तन करून त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. त्यांच्या

Madha : कुर्डूवाडी नगरपालिकेच्या 17 जागा स्वबळावर लढवणार (Video)
Solapur : वाळू तस्कराने चिरडलेल्या पोलिसावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…
Solapur : ना.सतेज पाटलानी घेतला विविध विभागाचा आढावा (Video)

अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्यांचे ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मन परिवर्तन करून त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक करत पोलीस प्रशासनाचा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, पंढरपूर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे, राजेश धडस, शहाजी सलगर, बाबा काळे, माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन ही मोहीम राबवली. ज्या- ज्या ठिकाणी अवैधरित्या हातभट्टीची दारू विक्री करत असलेल्या लोकांचे मनपरिवर्तन करून त्यांना दुसऱ्या व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात आले. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे निरीक्षक निंबाळकर आणि त्यांच्या टीमनेही अनेक गावात अशा लोकांचे मनपरिवर्तन करून त्यांना योग्य रस्त्यावर मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. 

COMMENTS