Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजसेवक देडगांवकरांचा ४६ वर्षांच्या समाजसेवेबद्दल सन्मान  

अहिल्यानगर : गेल्या तब्बल ४६ वर्षांपासून निस्वार्थ भावनेने अहोरात्र समाजसेवा करणाऱ्या अहिल्यानगर येथील समाजसेवक अविनाश देडगांवकर यांचा शनिवारी (द

विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
कोपरगावमध्ये जप्त वाहनांचा जाहीर लिलाव २३ मार्चला
एलपीजी गॅसवरून संसदेत खडाजंगी; सत्ताधारी-विरोधकांमध्ये तीव्र वाद, राज्यसभेचे वातावरण तापले

अहिल्यानगर : गेल्या तब्बल ४६ वर्षांपासून निस्वार्थ भावनेने अहोरात्र समाजसेवा करणाऱ्या अहिल्यानगर येथील समाजसेवक अविनाश देडगांवकर यांचा शनिवारी (दि. १४ मार्च) गौरव करण्यात आला. नगरसेवक योगिराज गाडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यश ग्रँड हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता गेली अनेक वर्षे समाजहितासाठी कार्य करणाऱ्या देडगांवकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. देडगांवकर यांनी विविध सामाजिक उपक्रमांतून सातत्याने समाजासाठी योगदान दिले असून त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. या प्रसंगी राकेश बोगावत, प्रथमेश महेंद्रकर आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS