Homeताज्या बातम्यादेश

…तर, आम्ही आमचे पदके परत करू ः पुनिया

दिल्ली पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट ः कुस्तीपटूंना दुखापत

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या 12 दिवसांपासून भारतीय कुस्तीपटू भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी ज

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दहा पोलिसांचा झाला मृत्यू
उद्योजकाला प्रेमात अडकवून उकळले सव्वा कोटी
105 नगर पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसींचं नुकसान झालं नसतं | LOKNews24

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या 12 दिवसांपासून भारतीय कुस्तीपटू भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. मात्र बुधवारी मध्यरात्रीनंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांशी केलेल्या झटापटीत अनेक आंदोलक जखमी झाले आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारला पदके परत करण्याचा इशारा कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलकांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलतांना बंजरंग पुनिया म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पाऊस सुरू असल्याने आम्ही झोपण्यासाठी बेड आणले होते. मात्र, त्यावर दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेतला. तसेच त्यांनी खेळाडूंबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आम्हाला मारहाणही केली, अशी प्रतिक्रिया बंजरंग पुनियाने दिली. पुढे बोलताना त्याने केंद्र सरकारला सर्व पदके परत करण्याचाही इशारा दिला. दिल्ली पोलीस ब्रिजभुषण शरण सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीविरोधात आम्ही तक्रार दाखल केली. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र, देशासाठी पदके जिंकणार्‍या खेळाडूंबरोबर गैरवर्तन केले जात आहे. जर सरकारला आमचा आदर करता येत नसेल, तर आम्ही सर्व पदके परत करू, असेही तो म्हणाला.
बुधवारी रात्री पावसामुळे अंथरुन व रस्ते ओले झाल्यामुळे कुस्तीपटू पलंग घेऊन मैदानावर पोहोचल्याने वाद सुरू झाला. आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती हेही पलंग घेऊन पोहोचले. पोलिसांनी पैलवान व भारती यांना रोखले असता वादाला सुरुवात झाली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण पैलवान संतापले. किरकोळ झटापट झाली. भारती यांच्यासह अनेकांना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेचा व्हिडिओ व फोटोही समोर आलेत. पैलवानांनी सांगितले की, आम्ही केवळ पलंग घेऊन जात होतो. पोलिसांनी अचानक आमच्यावर हल्ला केला. अनेक पोलिस मद्यधुंद स्थितीत होते. त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. कुस्तीपटूंनी एका पोलिसालाही पकडले. तो नशेत गैरवर्तन करत असल्याचा आरोप आहे. विनेशने सांगितले की, तिचा भाऊ दुष्यंतच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दुसरा पैलवान राकेशही जखमी झाला आहे. मागील 12 दिवसांपासून जंतरमंतरवर धरणे देणार्‍या कुस्तीपटू गुरुवारी म्हणाले की, हाच दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकले होते. आम्ही आमची सर्व पदके सरकारला परत करू. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल, शेतकरी व खाप नेते जंतरमंतरवर पोहोचलेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नवज्योत सिंग सिद्धू व बॉक्स विजेंद्र सिंह यांनीही पैलवानांना पाठिंबा दर्शवला आहे.

खा. बृजभूषणवर 7 खेळाडूंचे लैंगिक शोषणाचे आरोप- एका अल्पवयीन मुलीसह 7 महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेत. तेव्हापासून ते बृजभूषण यांच्या अटकेची मागणी करत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच पोलिसांचा मज्जाव- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल आंदोलकांना भेटण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचल्या. त्यांनी येथील सर्व पैलवानांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, रात्री 1.30 वा. त्या जंतरमंतरवर आल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना आंदोलकांना भेटू दिले नाही. त्यांना जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांना अनेक तास तिथे बसवून ठेवल्यानंतर पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवर येण्यास मज्जाव केला.

COMMENTS