Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, सदाशिव लोखंडे यांचा विजय आठवे आश्‍चर्य ठरेल

डॉ. अशोक सोनवणेअहमदनगर ः शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या निमित्त रणधुमाळीत सदाशिव लोखंडे यांच्यावर जनता किती नाराज आहे, ते प्रकर्षाने दिसून येत आहे. न

सहसचिव डिंगळे, बार्टीच्या संचालकांचा नियमबाह्य खुलासा  
खा. लोखंडेंचा स्वीय सहायक दिशागतच ठरतोय विजयात अडथळा  
कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांचा बोगस टेंडरचा महाघोटाळा

डॉ. अशोक सोनवणे
अहमदनगर ः शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या निमित्त रणधुमाळीत सदाशिव लोखंडे यांच्यावर जनता किती नाराज आहे, ते प्रकर्षाने दिसून येत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कोपरगाव, श्रीरामपूर वगैरे तालुक्यातील आमच्या प्रतिनिधींनी मतदार संघ अक्षरशः पिंजून काढला. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची जी मोदी लाट होती, ती लाट शिर्डी लोकसभा मतदारसंघत्तत प्रकर्षाने जाणवत नाही. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातूनही आमचे प्रतिनिधी फिरले असता, बांधावरचा शेतकरी असो की, खेडेगावातला चावडी जवळचा न्हावी असो, त्यांचा एकच सूर निघाला आम्ही सदाशिव लोखंडे कोण, आणि ते कसे आहेत,  अजून पाहिले नाही. अर्थात खासदाराकडे ग्रामीण माणसे वैयक्तिक काम नडत नसले तरी वाकचौरांच्या बाबतीत मात्र असे विधान कोणी केलेले नाही. आताशी कुठे अगदी भरपेट स्थिरावल्यानंतर लोखंडेंनी श्रीरामपूर तालुक्यातील वळदुंबर गावाला चुकीचा बंगला बांधला असला तरी श्रीरामपूर शहरातील म्हाडा कॉलनीत बेकायदेशीर बांधून कार्यालय थाटले असले तरी त्यांचा म्हणावा तसा संपर्क नसल्यामुळे त्यांच्याकडे ‘मुंबई का बाबू’ या अर्थानेच पाहिले जाते.

या निवडणुकीत प्रकाशाने एक मात्र जाणवले ते म्हणजे, खासदार सदाशिव लोखंडे यांचा ओव्हर कॉन्फिडन्स. अशावेळी विखेंसारखी पिढ्यानपिढ्या राज्य करणारी धुरंधर माणसे सुद्धा अगदी किरकोळ कार्यकर्त्यांनाही महत्व दिल्याशिवाय राहत नाही. मात्र लोखंडे साहेबांकडे कार्यकर्त्यांना किंमत नसल्यामुळे आणि कैलासवासी जयंतरावजी ससाणे यांच्या छत्रछायेखाली जमिनीवर राहण्याचे संस्कार मिळालेले सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय छल्लारे माजी नगराध्यक्ष, संजय फंड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, अशोक मामा थोरे, लखन भैय्या भगत, माजी नगरसेवक आशिष धनवटे आणि ससाने यांचे चिरंजीव करणदादा ससाने, नगरसेवक काजिबाबा व उर्स कमिटीचे हाजी मुज्जूभाई यांच्या भोवती कार्यकर्त्यांनी अक्षरशः गराडा केला. या मंडळींनी निस्वार्थ भावनेने उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूरला पाऊस ठेवण्याच्या आतच ग्रामदेवतेला दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. मोठ्या प्रमाणात प्रमाणात रॅली आणि मेळावे घेऊन त्यांनी वाकचौरे यांच्या पारड्यात मतांचे खूप मोठे वजन टाकले आणि त्यातल्या त्यात माजी उपनगराध्यक्ष व एक गटा मतदान असणारे अंजुमभाई हेही जोराने कामास लागले हे झाले श्रीरामपूरचे चित्र.

कोपरगावचे चित्र लोखंडेसाठी खूप काही आनंदाचे नाही, कारण शेवटपर्यंत कोल्हेे परिवाराने घेतलेली तटस्थतेची भूमिका ही लोखंडेंचे तेल लॅम्प लावण्यासाठी पुरेसे आहे, मात्र एक कबूलच करावे लागेल की उत्कर्षाताई रूपवते या खूप मोठे मताधिक्य घेणार असून वंचितचीही मते म्हणजे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ताटातला खूप मोठा घास असणार आहेत आणि ही सर्व मते वाकचौरे यांचा खूप मोठा तोटा करणारी आहेत. हे सर्व चित्र पाहता खासदार लोखंडे यांचा जर यदा कदाचित विजय झालाच तर ते आठवे आश्‍चर्य ठरेल, मात्र पराभव झाला तर आश्‍चर्य किंवा वाईट दोन्हीही मानण्याचे काही एक कारण नाही. मात्र महायुतीची ही जागा गेली अशीच चर्चा सध्या गावपातळीवर रंगतांना दिसून येत आहे.

9822254475 वर संपर्क साधा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची खासदारकी दोनदा मिळूनही खासदार सदाशिव लोखंडे यांना लोकाभिमुख कारभार करता आला नाही. केवळ भ्रष्टाचाराच्या कुरणात आपले हात कसे ओले होईल याची दक्षता त्यांनी नेहमीच घेतली. त्यामुळे त्यांच्यावर लोकांची प्रचंड नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील वाचकांनी आपले मते, तक्रारी, तसेच भ्रष्टाचारासंदर्भात असलेल्या तक्रारीची पोलखोल करण्यासाठी 9822254475 या क्रमाकांवर संपर्क साधावा. आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.

COMMENTS