मुंबई/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या छोट्याशा गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव दरडीखाली दबले गेले.रस्त्याची कोणतीही

मुंबई/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या छोट्याशा गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव दरडीखाली दबले गेले.रस्त्याची कोणतीही सुविधा नसल्यामुळे याठिकाणी गाड्या नेता येत नाही, परिणामी बचावकार्यात अडथळे निर्माण होत असून, गुरुवारी 16 तर शुक्रवारी 4 जणांचे मृतदेह सापडल्यामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे चिखल उपसून काढण्यात अडचणी येत असल्यामुळे दरडीखाली दबलेल्यांची सुटका होवू शकलेली नाही. यासंदर्भात विधानसभेत निवदेन करतांना मुख्यमंत्री शिंद म्हणाले की, सतत पडणारा पाऊस आणि चिखल, धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. त्या ठिकाणी अजून काही लोक अडकल्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेसोबत स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बचत कार्यात मदत केली. गुरूवारी दिवसभरात एकूण 119 लोकांना वाचवण्यात यश आले. नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहे. आतापर्यंत या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झालेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येत आहे. आजही या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. घटना घडल्यापासून दोन तासांच्या आत आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली, गिरीश महाजनांचे विशेष काम आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी या ठिकाणी राहून विशेष लक्ष देत आढावा घेतला. या सर्वांमुळे बचाव कार्यामध्ये गती आली, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इर्शाळवाडीमध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी काम करत असलेली यंत्रणा जीव ओतून काम करत आहे. त्या ठिकाणी अडकलेल्या, वाचलेल्या सर्व लोकांची सोय आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. त्यासाठी कंटेनर मागवण्यात आलेले आहेत. जो पर्यंत त्यांची कायमस्वरूपी सोय होत नाही तोपर्यंत त्यांना मदत केली जाईल. जिल्हाधिकार्यांना तसे आदेश दिले आहेत. सिडकोला त्या ठिकाणी लोकांना कायमस्वरूपी घरं बांधण्याचा आदेश दिला आहे. या लोकांना सर्व त्या सोई उपलब्ध करून देण्यात येतील.
मुंबईसह कोकणात पावसाचा जोर सुरूच – सलग तिसर्या दिवशी पावसाची जोरदार आणि धुवाधार बॅटींग सुरु आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यासोबतच पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाकडून, मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पावसाने मुंबईत जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची ’तुंबई’ झाली आहे. हवामान खात्याने ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
COMMENTS