Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंटेनरमधून गोवंश जनावरांची तस्करी

अकोल्यात पोलिसांची कारवाई; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त अकोले  : कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणारा कंटेनर अकोले पोलिसांनी कारवाई करून पकडला. या कारवाईत २६ गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली असून, सुमारे ३६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंश जनावरांच्या गळ्यास, शिंगांना, शेपटाला व पोटाला दोऱ्या बांधून कोणतीही काळजी न घेता त्यांना दाटीवाटीने कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक करण्यात येत होती. अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा शिवारात पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व पोलीस कॉन्स्टेबल सुहास गोरे हे ‘मिशन ऑलआऊट’ अंतर्गत गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, राहुल अनिल ढोक यांनी कळस गावाजवळून पोलिसांना फोन करून बंद कंटेनरमधून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती दिली. तसेच कंटेनरच्या पुढे  एक्सयूव्ही ३०० गाडी दिशादर्शनासाठी जात असल्याचेही त्यांनी कळविले. या माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खाडे यांनी तत्काळ कळस येथे धाव घेतली. घटनास्थळी बजरंग दलाचे राहुल ढोक, नागेश चिंतामण कदम यांच्यासह इतर कार्यकर्ते जमा झाले. पोलिसांनी कंटेनर अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये २६ गोवंश जनावरे क्रूरतेने कोंबलेली आढळून आली. या कारवाईत दहा टायरचा कंटेनर व एक्सयूव्ही ३०० गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. कंटेनरचा चालक फरार झाला असून, एक्सयूव्हीवरील चालकाने आपले नाव नरेश विलास मुर्तडक (वय ३९, रा. राजूर, ता. अकोले) असे सांगितले. मात्र, गुरे वाहतुकीचा परवाना तसेच खरेदी-विक्रीची कोणतीही वैध कागदपत्रे तो सादर करू शकला नाही. या प्रकरणी नरेश विलास मुर्तडक व अज्ञात आरोपींविरुद्ध कत्तलीच्या इराद्याने गोवंश जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत.

कोतुळेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम
अगस्ती विद्यालयाचा पारितोषिक समारंभ उत्साहात
दहावीच्या  निरोप समारंभात कवितांचा बहर

अकोल्यात पोलिसांची कारवाई; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोले  : कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणारा कंटेनर अकोले पोलिसांनी कारवाई करून पकडला. या कारवाईत २६ गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली असून, सुमारे ३६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोवंश जनावरांच्या गळ्यास, शिंगांना, शेपटाला व पोटाला दोऱ्या बांधून कोणतीही काळजी न घेता त्यांना दाटीवाटीने कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक करण्यात येत होती. अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा शिवारात पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व पोलीस कॉन्स्टेबल सुहास गोरे हे ‘मिशन ऑलआऊट’ अंतर्गत गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, राहुल अनिल ढोक यांनी कळस गावाजवळून पोलिसांना फोन करून बंद कंटेनरमधून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती दिली. तसेच कंटेनरच्या पुढे  एक्सयूव्ही ३०० गाडी दिशादर्शनासाठी जात असल्याचेही त्यांनी कळविले. या माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खाडे यांनी तत्काळ कळस येथे धाव घेतली.

घटनास्थळी बजरंग दलाचे राहुल ढोक, नागेश चिंतामण कदम यांच्यासह इतर कार्यकर्ते जमा झाले. पोलिसांनी कंटेनर अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये २६ गोवंश जनावरे क्रूरतेने कोंबलेली आढळून आली.

या कारवाईत दहा टायरचा कंटेनर व एक्सयूव्ही ३०० गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. कंटेनरचा चालक फरार झाला असून, एक्सयूव्हीवरील चालकाने आपले नाव नरेश विलास मुर्तडक (वय ३९, रा. राजूर, ता. अकोले) असे सांगितले. मात्र, गुरे वाहतुकीचा परवाना तसेच खरेदी-विक्रीची कोणतीही वैध कागदपत्रे तो सादर करू शकला नाही.

या प्रकरणी नरेश विलास मुर्तडक व अज्ञात आरोपींविरुद्ध कत्तलीच्या इराद्याने गोवंश जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत.

COMMENTS