Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत संथगतीने मतदान ; राज्यातील टक्का घसरला

मुंबईत सायंकाळी सहा वाजेनंतरही मतदानासाठी रांगा

मुंबई ः मुंबईतील 6 तर राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले. मात्र या मतदानावेळी मुंबईत संथगतीने मतदान पार पडल्याचा आरोप करण्य

 सोलापूर विमानतळ संदर्भात आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची
पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार
मुंबईला केंद्रशासित करण्याचा सोमय्यांचा कट – संजय राऊत

मुंबई ः मुंबईतील 6 तर राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले. मात्र या मतदानावेळी मुंबईत संथगतीने मतदान पार पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर राज्यात पुन्हा एकदा मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील मतदान केंद्रावर सकाळपासून सावळा गोंधळ उडाल्याने नागरिक संतापलेले पाहायला मिळाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी सरासरी 48.66 टक्के मतदान झाले. संथगतीने मतदान झाल्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान संपले नव्हते. सहा वाजेनंतरही रांगा दिसून येत होेत्या.

तत्पूर्वी दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तर मुंबईतील मतदारांनी मतदान झाल्याशिवाय केंद्रावरील अधिकार्‍यांना सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग हा भाजपची चाकरी करत असून ज्या ठिकाणी आम्हाला चांगली लीड मिळू शकते, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मतदारांना त्रास दिला जात असल्याचा घटना समोर आल्या आहेत. परंतु माझे मतदारांना आवाहन राहील की, नागरिकांनी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रात जावे, त्यानंतर रात्री किती वाजू द्या, तुमचा मतदानाचा हक्क बजवावा, तोपर्यंत केंद्रातील अधिकार्‍यांना सोडू नका, तुमचा मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही देखील उद्धव ठाकरे यांनी केले होते.

सहा वाजेपर्यंत रांगेत असणार्‍यांना करू दिले मतदान – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी देखील आवाहन केले आहे. मतदान केंद्रावर सहा वाजेर्यंत रांगेत असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता येणार आहे. त्यासाठी संबंधित केंद्रातील अधिकारी त्यांना टोकण देतील. त्यानुसार रात्री कितीही वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. सायंकाळी 6.00 वाजता जे मतदार मतदानासाठी रांगेत उभे असतील त्यांना मतदान करु दिले जाणार आहे. या वेळेपर्यंत रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राचे कामकाज सुरू राहील, अशी सूचना मा. निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

पवईत दोन तास ईव्हीएम मशीन बंद – पवईत ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार अभिनेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी दुपारी 12 च्या सुमारास केली आहे. त्यानंतर जवळपास तासाभराने ईव्हीएम रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. मात्र त्यानंतर एक ते दीड तास उलटून गेला. तरी देखील दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत झाली नाही. अभिनेता आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह शंभरपेक्षा अधिक लोक मतदानासाठी ताटकळत उभे राहिले आहेत.

COMMENTS