Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड आणि शिरूर तालुक्यात परत आसमानी संकट

शासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करावी-आ संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - मागील मार्च महिन्यात दि.16, 17, 18 या तारखेस बीड आणि शिरूर कासार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता.

पवार साहेबांच्या सभेतून मिळणार महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा- संदीप क्षीरसागर
अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत करा
पेठ बीड भागाचा पाण्याचा दुष्काळ संपणार !

बीड प्रतिनिधी – मागील मार्च महिन्यात दि.16, 17, 18 या तारखेस बीड आणि शिरूर कासार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता. या आणखी पंचनामे पण पूर्ण झाले नाहीत आणि जे झाले तिथं अनुदानात मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाली. अशातच परत एकदा बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर का. तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये नैसर्गिक वातावरण बदल झाल्याने आज दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपीट झालेली आहे. सदरील झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील उभ्या पिकांची, फळबागेचे, भाजीपाल्याचे सर्व रित्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच वीज पडल्याने बीड तालुक्यातील फुकेवाडी, ढेकणमोहा, घोसापुरी, वंजारवाडी व मांजरसुंबा अंतर्गत चोरमले वस्ती या ठिकाणी पशुधनहानी व मनुष्य इजा देखिल झालेली आहे व ग्रामीण भागातील काही घरांची पडझड झालेली आहे.बीड तालुक्यातील काही ठिकाणी पशुधन देखिल मृत्युमुखी पडलेले आहे व ग्रामीण भागातील काही घरांची पडझड झालेली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वीज पडणे अशा झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे होणे बाबत विभागाला आदेशीत व्हावे व यापुर्वी झालेल्या नुकसानीचे, आज झालेल्या नुकसानीचे शेतकरी बांधवांना तातडीने आर्थिक मदत करून बळीराजाचे मनोगत वाढवावे असे आशियाचे पत्र आ संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री अतुल सावे ,बीड जिल्हा, विभागीय आयुक्त,छत्रपती संभाजीनगर, कृषी आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी,बीड, तहसीलदार बीड व शिरूर का., जिल्हा कृषी अधिक्षक बीड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जि.प.बीड.यांनादिले आहे.

COMMENTS