Homeताज्या बातम्याफीचर

त्‍वचेला योग्‍य पोषण मिळण्‍यासह त्‍वचा बनते अधिक कोमल व तेजस्‍वी  

नाशिक: हिमालया वेलनेस कंपनी या भारतातील आघाडीच्‍या वेलनेस ब्रॅण्‍डने नवीन आयुर्वेदा सँडल ग्‍लो सोप लाँच केला आहे. या साबणामध्‍ये चंदनादी रोपन तेल

श्रीलंकेला ठेच लागलीय भारताने शहाणं व्हावं !
प्रा. डॉ. रत्नमाला प्रकाश सोनवणे युरोपला रवाना
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीड लाख आणि दागिने घेऊन नवरी फरार

नाशिक: हिमालया वेलनेस कंपनी या भारतातील आघाडीच्‍या वेलनेस ब्रॅण्‍डने नवीन आयुर्वेदा सँडल ग्‍लो सोप लाँच केला आहे. या साबणामध्‍ये चंदनादी रोपन तेल संपन्‍न प्रमाणात आहे. या पारंपारिक आयुर्वेदिक तेलामध्‍ये आपल्‍या त्‍वचेसाठी आवश्‍यक घटक – शुद्ध चंदन आहे, जे त्‍वचा कोमल व तेजस्‍वी करते. हे अद्वितीय सुत्रीकरण त्‍वचा स्‍वच्‍छ करते, त्‍वचेला पोषण देते आणि त्‍वचा टवटवीत करते, तसेच यामुळे नैसर्गिकरित्‍या त्‍वचा स्‍वस्‍थ व तेजस्‍वी बनते. लाँच करण्‍यात आलेल्‍या या उत्‍पादनाबाबत मत व्‍यक्‍त करत हिमालया वेलनेस कंपनीच्‍या मार्केटिंग – कंझ्युमर प्रॉडक्‍ट्स डिव्हिजनचे जनरल मॅनेजर श्री. सुशील गोस्‍वामी म्‍हणाले, ”आयुर्वेद पर्सनल केअर उत्‍पादन विभागामधील अग्रणी हिमालया वेलनेस कंपनीमध्‍ये आमचा आजच्‍या काळातील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आधुनिक स्‍वरूपात पारंपारिक, आयुर्वेदिक पद्धतींना सादर करण्‍याचा मनसुबा आहे. आयुर्वेदा सँडल सोप आयुर्वेदाच्‍या ज्ञानाचा वापर करून तयार करण्‍यात आला आहे. या सोपच्‍या माध्‍यमातून आपल्‍या सेल्‍फ-केअर नित्‍यक्रमांमध्‍ये चंदन तेलाच्‍या अद्भुत लाभांची भर करण्‍यात आली आहे.”आयुर्वेदा सँडल ग्‍लो सोपची किंमत ७५ ग्रॅमसाठी ४४ रूपये आणि १२५ ग्रॅमसाठी ६९ रूपये आहे. आयुर्वेदा सँडल ग्‍लो सोप सर्व रिटेल व ई-कॉमर्स व्‍यासपीठांवर उपलब्‍ध आहे.

COMMENTS