Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारूर घाटात अपघाताची मलिका सुरुच एकाच वेळी सहा वाहने एकमेकांना धडकली

किल्ले धारूर प्रतिनिधी - धारूर घाटात सकाळी साडे आठच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात सहा वाहने एकमेकांना धडकली. या अपघातातील दुचाकीस्वार गंभीर

समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
वसईत स्कूटीवरील दोन भावांना कारने उडवले
पुणे-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात .

किल्ले धारूर प्रतिनिधी – धारूर घाटात सकाळी साडे आठच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात सहा वाहने एकमेकांना धडकली. या अपघातातील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. महेश लाखे असे त्याचे नाव आहे. अंबाजोगाई येथील एस आर टी येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी वरील धारूर तेलगाव रस्त्यावर अवघड घाट आहे. मात्र अरूंद रस्ता असल्याने या घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे अपघात होण्याची सतत घडत आहेत.अरुंद रस्ता व अवघड वळणांमुळे सतत अपघात होत असलेल्या धारुर घाटात आज सकाळी पुन्हा विचित्र अपघात झाला. घाटातील एका अवघड वळणावर सिमेंट घेऊन जाणारे वाहन व किर्टिका गाडीचा (चक22-थ3109) अपघात झाला. त्याचवेळी अपघाताच्या ठिकामी दुसर्‍या सिमेंट घेऊन जाणार्‍या वाहनाने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या धडकेने दुचाकी (चक23ग9310) समोर असलेल्या क्रुझर (चक13 ऊए1478) ला मागून जाऊन धडकली. तर क्रूजर पुढील एका टिप्परला आदळली. या अपघातामध्ये दुचाकी वरील महेश लाखे हा गंभीर जखमी झाला आहे. महेश हा पाणी फाऊंडेशनचा कार्यकर्ता असून तो कामा निमित्त जात होता. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे संरक्षण भिंती कठड्याची उंची आणि रस्त्याची उंची सारखीच असल्याने हे अपघात वारंवार घडत आहेत तसेच रस्ता अरुंद आहे यामुळेही अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे राष्ट्रीय महामार्ग म्हणायला देखील आता लाज वाटत आहे. लोकप्रतिनिधींनी तर फक्त आम्ही मतदाना पुरतेच येणार अशी शपथच घेतली आहे की काय ? असे आता वाटत आहे जनतेच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

COMMENTS