Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मसुचीवाडी हायस्कूलचे सहा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र : दोन लाख तीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार

इस्लामपूर / प्रतिनिधी : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापुर संचलित तुकाराम सावळा कदम विद्यामंदिर मसुचीवाडी (ता. वाळवा) विद्यालयातील 6 विद

आमदार पद भांडणं लावण्यासाठी नसते : निशिकांत भोसले-पाटील
डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार ‘नाम’ची ऊर्जा वाढवणारा : नाना पाटेकर
कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी

इस्लामपूर / प्रतिनिधी : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापुर संचलित तुकाराम सावळा कदम विद्यामंदिर मसुचीवाडी (ता. वाळवा) विद्यालयातील 6 विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाले. कु. सिध्दिका प्रकाश परब, सोहम एकनाथ माने, सोहम हणमंत पाटील, अमेय सुधीर फाटक, कु. तनया अजित कदम, समर्थ संभाजी कदम हे सहा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
त्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वार्षिक नऊ हजार सहाशे रुपये प्रतिवर्षीप्रमाणे इयत्ता नववी ते बारावी अखेर शिष्यवृत्ती मिळणार आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव सौ. शुभांगी गावडे, अर्थ सहसचिव मिलिंद हुजरे सीईओ कौस्तुभ गावडे, मुख्याध्यापक व्ही. डी. माळगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक खोत, उपसरपंच संजय कदम, शंकर कदम यांनी अभिनंदन केले.
संस्थेच्या समितीचे प्रमुख श्रीराम साळुंखे, विभाग प्रमुख पी. एल. हाके यांचे मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना एनएमएमएस विभाग प्रमुख सौ. एम. बी. फाटक, यू. बी. जाधव, श्रीमती एस. व्ही. रोकडे, ए. व्ही. मुंडे, बी. आर. संकपाळ, सौ. एस. आर. कदम व सौ. व्ही. ए. बारटक्के, एस. एस. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS