Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारावीत लागलेल्या आगीत सहा जण होरपळले

मुंबई ः मुंबईच्या धारावी परिसरात मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत सहा जण होरपळल्याची माहिती समोर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड

महिला अत्याचारातील वाढ चिंताजनक
मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाची हाक; महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आमची संयमाची भूमिका – संभाजीराजे
बालाजीला केस अर्पण करणे पडले महागात, नोकरी गेली

मुंबई ः मुंबईच्या धारावी परिसरात मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत सहा जण होरपळल्याची माहिती समोर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने याबाबत मााहिती दिली. महापालिकेच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, धारावी परिसरातील काळा किला येथे असलेल्या अशोक मिल कंपाऊंडमधील तीन मजली आणि चार मजली इमारतींना पहाटे 3.45 च्या सुमारास आग लागली. शहर पोलीस, नागरी वॉर्ड कर्मचारी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले आणि चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. जखमींना तातडीने बीएमसीच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलमान खान (वय, 26), मनोज (वय, 25), अमजद (वय, 22) आणि सल्लाउद्दीन (वय, 28), सैदुल रहमान (वय, 26) आणि रफिक अहमद (वय, 26) असे आगीत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. सलमान खान आणि मनोज दोघेही 8-10 टक्के भाजले आहेत. तर, अमजद, सल्लाउद्दीन आणि सैदुल हे सर्व 35-50 टक्के भाजले आहेत. रफिक अहमदच्या हाताला किरकोळ दुखापत झाली होती, त्याच्यावर उपचार करून त्याला सोडण्यात आले.

COMMENTS