Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योगाचार्य नांदेड योग भूषण सिताराम सोनटक्के यांच्या योगिक धावण्याचे 100 दिवस पूण

आमदार कल्याणकर व जिल्हाप्रमुख मुंडे यांची उपक्रमाला उपस्थिती नांदेड । प्रतिनिधी वामननगर ते भक्ती लॉन्स मंगल कार्यालयापर्यंत रोज सकाळी4:30 ते 5 पर्यंत

पुरुष हक्क समितीचे नांदेड येथे 28 वे राष्ट्रीय अधिवेशन
Nanded : ग्राम रोजगार सेवकांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण (Video)
नांदेडमध्ये पीएम विश्‍वकर्मा प्रदर्शनीची ‘कलाकुसर’

आमदार कल्याणकर व जिल्हाप्रमुख मुंडे यांची उपक्रमाला उपस्थिती
नांदेड । प्रतिनिधी
वामननगर ते भक्ती लॉन्स मंगल कार्यालयापर्यंत रोज सकाळी4:30 ते 5 पर्यंत धावत येऊन 5 ते 7 योग वर्ग घेणे या नित्य क्रमाला योगाचार्य सिताराम सोनटक्के यांच्या उपक्रमास आज शंभर दिवस पूर्ण झाले.त्यांना रोज योग शिक्षक राम जनकवाडे, योग साधिका कविता पांचाळ यांनी साथ दिली. विशेषतः या उपक्रमाला नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजीराव कल्याणकर, शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.
भक्ती लॉन्स मालेगाव रोड येथे गेल्या दोन वर्षापासून मोफत नित्ययोग वर्ग चालतो. या नित्य योगास दररोज400ते 500 योग साधक योग साधना करण्यासाठी उपस्थित असतात. विशेष म्हणजे एकही दिवस गेल्या दोन वर्षात सुट्टी न घेता हा योग वर्ग चालू आहे. योगाचार्य नांदेड योग रत्न भूषण सिताराम सोनटक्के गुरुजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा योग वर्ग चालत असून परमपूज्य स्वामीजी महाराज यांच्या संकल्पनेनुसार योग साधकांनी रोज धावावे आणि मग योग करावा या अनुषंगाने मागच्या शंभर दिवसापासून सोनटक्के गुरुजी यांनी रोज वामन नगर येथील आपल्या निवासस्थानापासून ते भक्तीलास मंगल कार्यालय पर्यंत रोज योगिक दौड आरंभ केली होती. त्याला आज शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसाचे निमित्य पाहून शेकडे योग साधकांनी या धावण्यामध्ये सहभाग नोंदवला. भक्ती लॉन्स येथील योग वर्गात शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी यावेळी योगाचार्य सिताराम सोनटक्के यांचे विशेष स्वागत केले. त्यानंतर आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी त्यांच्या निवासस्थानी योगाचार्य नांदेड योग रत्न भूषण सीताराम सोनटक्के गुरुजी यांचा या उपक्रमाबद्दल विशेष सत्कार केला. या प्रसंगी योग साधक विलास अप्पा कवठेकर आणि बाळकृष्ण पसलवाड यांच्या वतीने सोनटक्के गुरुजी यांचा सत्कार करून शेकडो योग साधकांना पौष्टिक लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.याप्रसंगी शेकडो पुरुष व महिला योगसाधकांची उपस्थिती होती.

COMMENTS