बर्मिंगहॅम/वृत्तसंस्था : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी दुसर्या दिवशी भारताचे खाते रौप्य पदकान
बर्मिंगहॅम/वृत्तसंस्था : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी दुसर्या दिवशी भारताचे खाते रौप्य पदकाने उघडले आहे. भारताला पहिले पदक स्टार वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने दिले आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत त्याने ही कामगिरी केली. संकेत सरगरने दोन फेर्यांच्या 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. संकेत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे. त्याच्या या यशाने महाराष्ट्राची मान उंचावली. त्याने क्लीन अँड जर्क प्रकारात पहिल्या प्रयत्नात 135 किलो वजन उचलण्यात संकेतला अपशय आले होते. मात्र त्याने दुसर्या प्रयत्नात यशस्वीरित्या 135 किलो वजन उचलत जोरदार पुनरागमन केले. एकूण 248 किलो वजन उचलून तो पुन्हा एकदा फायनलच्या यादीत अव्वल स्थानावर पोहचला. मात्र त्याला तिसर्या 139 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्न फसला. त्याच्या हाताला दुखापत देखील झाली. त्यानंतरही त्याने 141 किलो वजन उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तरी देखील तो सुवर्ण पदकाच्या रेसमध्ये होता. मात्र मलेशियाच्या मोहम्मदने संकेतपेक्षा एक किलो वजन जास्त उचलत अखेरच्या क्षणी संकेतकडून सुवर्ण पकद हिसकावले.
शेवटच्या दोन प्रयत्नांत सुवर्णपदक हुकले
दुसर्या फेरीअखेर दोन प्रयत्नांत संकेतला दुखापतही झाली. दुसर्या प्रयत्नात संकेतने 139 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो उचलू शकला नाही आणि तो जखमी झाला. वैद्यकीय पथकाने चिन्ह लक्षात घेतले आणि ताबडतोब उपचार केले. येथे संकेतने तो ठीक असल्याचे सांगितले आणि तिसर्या प्रयत्नासाठी सज्ज झाला. तिसर्या वेळीही संकेतने पुन्हा एकदा 139 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा अपयशी ठरला आणि यावेळीही तो जखमी झाला. अशाप्रकारे संकेतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
COMMENTS