मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमा अनेक नेत्यांनी आपली मते व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आ
मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमा अनेक नेत्यांनी आपली मते व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते या पदात अजिबात रस नसून, आपल्याला पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी देण्याची मागणी केली होती. जयंत पाटील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याचे देखील पवार यांनी सांगितले होते, त्यामुळे अजित पवारांचा डोळा प्रदेशाध्यक्षपदावर असल्याचे बोलले जात होते, मात्र दिल्लीत लवकरच पक्षाची बैठक होणार असून, यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रस भाकरी फिरवण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदावर अजित पवार तर विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राजकीय गणिते पदाची अपेक्षा व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू जुळविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार तर विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षातील फायर ब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. दिल्लीत 28 जून रोजी होणार्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे वजनदार नेते असल्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पक्षाने दखल आठवडाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगाने घडामोडी घडत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लोकसभेची निवडणूक होईल. लोकसभेबरोबरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीचा पक्षाला फटका बसू नये यासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर इतर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासोबतच पक्षातील संघटनात्मक बदलाबाबत पवार निर्णय घेतील, अशी चर्चा आहे. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसी समाजाला द्यावे, अशी सूचना केली होती. परंतु लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक होण्याच्या चर्चेमुळे अजित पवार यांच्यासारख्या आक्रमक नेत्याच्या हाती पक्षाची धुरा सोपवण्यास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पसंती दिल्याचे समजते. या बदल्यात धनंजय मुंडे यांच्यावर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद सोपवले जाणार असल्याचे समजते.
धनंजय मुंडे होणार विरोधी पक्षनेते – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिलेले असून, त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव असल्यामुळे त्यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता बोलली जात आहे. याचबरोबर मुंडे ओबीसी समाजातील असल्यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन्ही गटामध्ये समन्वय साधण्यात मदत होईल अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र याचा फैसला दिल्लीतील बैठकीतच होणार आहे.
COMMENTS