अनेक नगरसेवक बंडखोरी करण्याच्या तयारीतमुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली आहे. ठाकरे गटाने या निवडण

अनेक नगरसेवक बंडखोरी करण्याच्या तयारीत
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली आहे. ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे, त्याअनुषंगाने ठाकरे गटाकडून बैठकांचा धडाका लावण्यात येत आहे. नुकतीच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची मातोश्रीवर आढावा बैठक पार पडली, यात नगरसेवकांनी नाराजीचे सूर उमटले, कोणत्याही निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचा सूर या नगरसेवकांनी लावला, त्यामुळे ठाकरे गटासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीपासून आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. मातोश्रीवर होणार्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवले जात नसल्याने अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदार संघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते, अशी स्पष्ट तक्रार एका नगरसेवकाने बैठकीत केल्याचे समजते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्याप्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याने ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत होते. मात्र, आता शिंदे गटाऐवजी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. 2017 साली ठाकरे गटाचे निवडून आलेले एकूण नगरसेवक 84 आणि मनसेचे 6 नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला यासोबतच 2 नगरसेवक कोर्टातील प्रक्रियेच्या माध्यमातून निवडून आले. तसेच शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेनेला 7 अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला. अशी सर्व बेरीज करुन शिवसेनेकडे एकूण नगरसेवक 99 नगरसेवकांचे पाठबळ आहे. तर शिंदे गटात गेलेले नगरसेवक 36 आहेत, यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष अशा माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गटातील ताकद मुंबईत विखुरली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला अनेक नव्या दमाच्या नेत्यांना संधी द्यावी लागणार आहे, मात्र ठाकरे गटातील नेत्यांनी नाराजीचा सूर लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर या नगरसेवकांची समजून घालण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
ज्यांना जायचे त्यांनी जावे, मी कोणाला थांबवणार नाही : उद्धव ठाकरे
पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणे योग्य नाही. ज्याला जायचे आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. पक्षात नाराजीचा सूर आवळणार्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकार्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंचे शिवसेनेला सोडून गेले. त्यानंतर आता काहींनी नाराजीचा सूर आवळला आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकसंध शिवसेना असताना पक्षाचे नगरसेवक इतक्या उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची हिंमत करत नव्हते. मात्र, विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता पक्षातील नाराजांना उघडपणे नेत्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे.
COMMENTS