Homeताज्या बातम्याशहरं

फडणवीस सरकारमध्ये फेरबदलाचे संकेत? ; गिरीश महाजनांना डच्चू देवून नार्वेकरांना संधी ?

मुंबई ः राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचे सुरू असलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यातच हनीट्रप प्रकरणात सुरू असलेले आरोप-प्रत्याराोप बघता आणि व

बस झाडाला अडकली अन् प्रवासी बचावले
नातवानेच केली आजीची हत्या
सांगलीमध्ये पावसाची हजेरी
Maharashtra Updates: देवेंद्र फडणवीस आज शाम 5:30 बजे लेंगे सीएम पद की शपथ

मुंबई ः राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचे सुरू असलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यातच हनीट्रप प्रकरणात सुरू असलेले आरोप-प्रत्याराोप बघता आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे केलेले वक्तव्य, तसेच कृषीमंत्र्यांचे वारंवार वक्तव्य बघता राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल बघायला मिळू शकतात, मात्र त्यावर अधिकृत घोषणा अजून कोणत्याही भाजप नेत्याने केलेली नाही.
जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्‍वासू नेते गिरीश महाजन यांना डच्चू मिळण्याची शक्यता असून त्यांना पक्ष संघटनेत स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच 2022 पासून विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांनी सुद्धा विधानसभा अध्यक्षाऐवजी मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असून, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपदी बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र त्यावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र अकार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्यांचीही गच्छंती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर गुरूवारी अजित पवार यांन देखील कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देत फेरबदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांच्या मंत्र्यांच्या पोटात गोळा उठला आहे.

मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्षपद ?
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता. पण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आले. यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीमुळेच ते विधानसभेत सातत्याने सरकारला धारेवर धरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी फेरबदलांत त्यांनाही संधी मिळेल असे सांगितले जात आहे. त्यांच्याकडे राहुल नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्षपद सोपवले जाण्याची चिन्हे आहेत.

या मंत्र्यांची गच्छंती निश्‍चित!
सातत्याने वादग्रस्त विधाने करणार्‍या मंत्र्यांची गच्छंती निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह भरत गोगावले, योगेश कदम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ यांच्यावरही मंत्रिपद गमावण्याची नामुष्की येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS