माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर महानगरपालिकेचे लक्षणीय यश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर महानगरपालिकेचे लक्षणीय यश

अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा 2.0 हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला या उपक्रमा

महात्मा फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या
कोपरगावमध्ये महसूल विभागाच्या विरोधात शेतकरी आक्रमक
ऊस उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणार ः राजेंद्र नागवडे

अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा 2.0 हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला या उपक्रमात अहमदनगर महानगरपालिकेने सहभाग घेऊन नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागरूक केले जेणेकरून त्यांना पर्यावरणाच्या सुधारणेप्रति जागरूकतेने प्रयत्न करता येतील. या
अभियानातून अहमदनगर महानगरपालिकेला केलेल्‍या उल्‍लेखनीय कामगिरी बद्दल लक्षणिय यश प्राप्‍त झाले.
महाराष्‍ट्र राज्‍याचे मा.मुख्‍यमंत्री उध्‍दवजी ठाकरे, पर्यावरण व राजशिष्‍ठाचार मंत्री आदित्‍यजी ठाकरे साहेब यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या माझी वसुंधरा 2.0 अमृत गटामध्‍ये अहमदनगर महानगरपालिका राज्‍यात अव्‍वल ठरली. या निमित्‍ताने माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेचा सन्‍मान सोहळा रविवार दिनांक 5 जून 2022 रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी मा.मुख्‍यमंत्री उध्‍दवजी
ठाकरे साहेब यांच्‍या अध्‍यक्षेखाली तसेच मा.उपमुख्‍यमंत्री अजित दादा पवार, मा.महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात, मा. पर्यावरण व राजशिष्‍ठाचार मंत्री आदित्‍यजी ठाकरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर महानगरपालिकेला सन्‍मानीत करण्‍यात आले. यावेळी अहमदनगर महानगरपालिकेच्‍या मा.महापौर सौ. रोहिणीताई संजय शेंडगे, आयुक्‍त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, महिला बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती पुष्‍पाताई बोरुडे, मुख्‍य स्‍वच्‍छता निरिक्षक बिडकर व सारसर यांनी शहरवासियांच्‍या व‍तीने सन्‍मानपत्र स्विकारले. जागति‍क पर्यावरण दिनानिमित्‍त अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील वृक्षगणना उपक्रमास लवकरच सुरुवात केली जाणार असल्‍याचे महापौर यांनी जाहिर केले. वृक्षगणने अंतर्गत झाडांची उंची, वय, झाडांचा घेर, झाडांचे ऐतिहासिकत्‍व (हेरिटेज ट्री), झाडांचे भौगोलिक स्‍थान, देशी विदेशी झाडांचे वर्गीकरण, नामशेष होत चाललेल्‍या झाडांचे पुनरुज्‍जीवन अश्‍या गोष्‍टी या उपक्रमातून करुन निसर्गाबाबत जागृकता याकडे विशेष लक्ष देणार असल्‍याचे देखील महापौर यांनी सांगितले.

COMMENTS