Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धार्मिक कार्यात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान : कवाद

 निघोज : सण हिंदूंचा असो की मुस्लिम समाजाचा प्रत्येक सणात व धार्मिक कार्यात मुस्लिम समाजाचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी व्यक्त केले. निघोज येथील जामा मशिदीमध्ये मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ते बोलत होते. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, कोषाध्यक्ष रामदास वरखडे, सचिव शांताराम कळसकर, सहसचिव विश्वासराव शेटे, संघटक मंगेश वराळ, माजी सरपंच व विश्वस्त ठकारामशेठ लंके, विश्वस्त बबनराव लंके, अनिल लंके, रमेशशेठ ढवळे, अशोकराव वरखडे, शंकरराव लामखडे, संतोषशेठ रसाळ, बाळासाहेब लंके, ऍड. ज्ञानेश्वर लामखडे, बबनराव ससाणे, रोहिदास लामखडे, अनिल शेटे, विठ्ठलराव कवाद, सोमनाथ वरखडे, संदीप वराळ, सल्लागार रुपेश ढवण,दिलीप लाळगे, सुदर्शन लोढा, सदानंद ढवळे, मंगेश लंके, गंगाराम वराळ, नवनाथ लाळगे, रमेशशेठ लंके आदी तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कवाद म्हणाले मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट संचालित मळगंगा प्रसादालयाला मुस्लिम समाज बांधवानी देणगीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. तसेच यात्रा व जत्रा,उरुस या धार्मिक उत्सवात मुस्लिम समाज व हिंदू समाज एकत्र काम करीत असून हिंदू मुस्लिम समाजाचे सख्य वर्षानुवर्षे टिकून असून यापुढेही ही युवा पिढी हे सख्य अबाधित राखेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्ट व्यवस्थापक महेश ढवळे यांनी केले शेवटी विश्वस्त अशोकराव वरखडे यांनी आभार मानले. 

जिल्ह्यात आठवडाभर पुरेल एवढाच गॅसचा साठा!व्यावसायिक गॅसचा तुटवडा; खानावळी, हॉटेलचालक  संकटात, विद्यार्थ्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह
उर्सात बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला; 19 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त
नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती!; खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

 निघोज : सण हिंदूंचा असो की मुस्लिम समाजाचा प्रत्येक सणात व धार्मिक कार्यात मुस्लिम समाजाचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी व्यक्त केले. निघोज येथील जामा मशिदीमध्ये मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ते बोलत होते. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, कोषाध्यक्ष रामदास वरखडे, सचिव शांताराम कळसकर, सहसचिव विश्वासराव शेटे, संघटक मंगेश वराळ, माजी सरपंच व विश्वस्त ठकारामशेठ लंके, विश्वस्त बबनराव लंके, अनिल लंके, रमेशशेठ ढवळे, अशोकराव वरखडे, शंकरराव लामखडे, संतोषशेठ रसाळ, बाळासाहेब लंके, ऍड. ज्ञानेश्वर लामखडे, बबनराव ससाणे, रोहिदास लामखडे, अनिल शेटे, विठ्ठलराव कवाद, सोमनाथ वरखडे, संदीप वराळ, सल्लागार रुपेश ढवण,दिलीप लाळगे, सुदर्शन लोढा, सदानंद ढवळे, मंगेश लंके, गंगाराम वराळ, नवनाथ लाळगे, रमेशशेठ लंके आदी तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कवाद म्हणाले मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट संचालित मळगंगा प्रसादालयाला मुस्लिम समाज बांधवानी देणगीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. तसेच यात्रा व जत्रा,उरुस या धार्मिक उत्सवात मुस्लिम समाज व हिंदू समाज एकत्र काम करीत असून हिंदू मुस्लिम समाजाचे सख्य वर्षानुवर्षे टिकून असून यापुढेही ही युवा पिढी हे सख्य अबाधित राखेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्ट व्यवस्थापक महेश ढवळे यांनी केले शेवटी विश्वस्त अशोकराव वरखडे यांनी आभार मानले. 

COMMENTS