Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाकूरातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण; खड्ड्यांमुळे अपघात वाढले, धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले

चाकूर प्रतिनिधी - तालुक्यातून रत्नागिरी-नागपूर महामार्ग जात असून, काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, लातूररोड पासून चाकूर शहर ते अलगरवाडी फाटापर्य

नवाब मलिक यांना तूर्तास दिलासा नाहीच
राष्ट्रवादी विरोधक एकसंघ ठेवणे भाजपासाठी कसरत : निशिकांत पाटील यांना स्वकीयांचाच अडथळा
बदलापूर अत्याचारग्रस्त बालिकांना न्याय द्या

चाकूर प्रतिनिधी – तालुक्यातून रत्नागिरी-नागपूर महामार्ग जात असून, काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, लातूररोड पासून चाकूर शहर ते अलगरवाडी फाटापर्यंत रस्त्याची चाळणी झाली आहे. अनेकदा खड्डे बुजविण्यात आले असले तरी निष्कृष्ट कामामुळे परत खड्डे पडत आहेत. त्यातच धुळीचा त्रास वाढल्याने वाहनचालक, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
चाकूर ते लातूररोड दरम्यान आणि चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहने चालविणे तारेवरची कसरत झाली आहे. विश्रामगृह, जूने बसस्थानक, शहरानजिकचे पूल, पुढे पेट्रोल पंप, न्यायालय, तहसील येथील बसस्थानक तर विश्वशांतीधाम मंदीर, चाकूर ते अलगरवाडी फाटा या भागातही रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर लाखों रूपयाची उधळपट्टी झाली. मात्र, रस्ते मात्र दुरुस्त झालेच नाहीत. या रस्त्यावर हॉट मिक्सचे काम करण्यासाठी निविदा काढून कोटीचे उधळपट्टी झाली तरी रस्ता जैसे थे आहे. शहरानजिक ओद्योगिक वसाहतीचे दोन रस्ते आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने या भागातून जाणारी वाहने औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचा वापर करत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक वाहने या रस्त्यावर धावू लागली आहेत. त्यामुळे हाही रस्ता खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने दुरुस्तीची मागणी आहे.

COMMENTS