Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरंग महाराज डोंगरे यांच्या भव्यदिव्य रामकथेची मोठ्या उत्साहात सांगता

बीड प्रतिनिधी - श्री क्षेत्र महर्षी गौतम ऋषी संस्थान पालवण येथे मठाधिपती ह.भ.प.महंत गुरुवर्य रामायणाचार्य श्रीरंग महाराज डोंगरे यांच्या अमृततुल्य

ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे येऊ शकते तिसरी लाट
जळगाव जिल्ह्यातील अपघातात तिघे ठार
Yeola : पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Video)

बीड प्रतिनिधी – श्री क्षेत्र महर्षी गौतम ऋषी संस्थान पालवण येथे मठाधिपती ह.भ.प.महंत गुरुवर्य रामायणाचार्य श्रीरंग महाराज डोंगरे यांच्या अमृततुल्य वाणीतून सुरू असलेल्या रामकथेची सांगता आज झाली. गेल्या सात दिवसांपासून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम कथा सुरू होती. सांगताप्रसंगी सुमारे पाच हजार भाविकांच्या उपस्थिती होती.अमोघ वाणीतून कथा श्रवण करतांना पंचक्रोशीतील वातावरण अक्षरशः राममय झाले होते. भगवान श्रीरामाच्या जीवनातील अनेक प्रसंग डोंगरे महाराजांच्या रसाळ वाणीतून प्रकट होत असताना भाविक सद्गदित होत होते.कथा श्रवण करतांना प्रसंग परत्वे उत्कट भावना अनावर झाल्या. दररोज चार ते पाच तास कथा ऐकताना भाविक मंत्रमुग्ध होऊन जात.अतिशय भावपूर्ण शांत वातावरणात श्रोते तल्लीन होऊन जात होते.राजा दशरथाचे प्राणोत्क्रमण, भगवान श्रीरामांचे वनवास गमन,भरत भेट, वनवासातील दिवस,सीता हरण, अशोक वनातील सीतामातेचे वास्तव्य , अयोध्येत प्रभू श्रीरामांचे आगमन , राज्याभिषेक व रामराज्य या सर्व प्रसंगी श्रोते भावनांना आवर घालू शकले नाहीत. कथेला साथ संगत सिंथवादक, गायनाचार्य प्रल्हाद महाराज समगे, गायनाचार्य भागवत महाराज नरवडे, तबलावादक संदीप नरके, मृदंगाचार्य ज्ञानेश्वर माऊली भोसकर, टाळवादक महादेव रणखांब यांची होती.
कथेसाठी युवा कीर्तनकार अक्षय महाराज पिंगळे, हनुमानजी बिहानी,श्री क्षेत्र नारायण गडाचे विश्वस्त भीमराव भाऊ मस्के, पालवनचे उपसरपंच कांता नाना मस्के, यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.सांगता समारंभाच्या महाप्रसादाच्या अन्नदानाची सोय आसारामजी मानधने, रामविलासजी जाजू, बद्रीनारायणजी झंवर, जगदिशजी जाजू,हनुमानजी बिहानी या दानशूर भाविकांनी केली होती.सात दिवसही परिसरातील भाविकांनी अन्नदानाची सोय केली होती.

COMMENTS