Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीकृष्ण जीवनचरित्र सृष्टांची बाजू सांगणारे चिरंजीवचरित्र

माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर ः 5251 वा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करताना श्रीकृष्ण जीवनचरित्रातील कृष्णशिष्टाई म्हणजे युद्धबंदी सांगणारे तत्त्वज्ञान होय तर युद्धाखो

अरविंद गाडेकर यांची बहि:शाल वक्ता म्हणून निवड
बारावीच्या निकालात प्रवरेची गुणवता कायम
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

श्रीरामपूर ः 5251 वा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करताना श्रीकृष्ण जीवनचरित्रातील कृष्णशिष्टाई म्हणजे युद्धबंदी सांगणारे तत्त्वज्ञान होय तर युद्धाखोर प्रवृत्ती पाहून सृष्टांची, सत्याची, सर्वसामान्याची बाजू घ्या असे सांगणारे चिरंजीवचरित्र होय असे मत स्नेहपरिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील नेवासा रोडवरील महानुभाव मठ आणि श्रीकृष्ण मंदिरामध्ये कै. परमपूज्य परम महंत ब्रीजलालदादा पंजाबी यांच्या स्मृती प्रेरणेने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. मंदिर प्रमुख महंत गोविंदराज दादा पंजाबी यांनी सर्व मान्यवरांचा सन्मान केला. यावेळी घेण्यात आलेल्या कविता आणि निबंधलेखन स्पर्धेत यश मिळविणार्‍या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे प्रमाणपत्रे, पुस्तके, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याप्रीत्यर्थ मुठेवडगावचे माजी पोलिस पाटील वसंतराव मुठे पाटील यांचा वाचन संस्कृती प्रतिष्ठान व मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील यांनी सत्कार केला. नूतन मंदिर प्रमुख महंत गोविंदराज दादा पंजाबी आणि डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा पुणे विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल वसंतराव मुठे पाटील यांनी शाल, बुके, बुक देऊन सत्कार केले. हस्तरेषातज्ज्ञ ह.भ.प. सोपानराव वेताळ महाराज यांनी आपल्या प्रवचनातून मानवी देह,आत्मा, मन यांचे तत्त्वदर्शी चिंतन करून नश्‍वर देह   आणि          शुद्ध कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले.यावेळी वसंतराव मुठे, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य किसनराव वमने, प्राचार्य के.एस. काळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रा. शिवाजीराव बारगळ, पत्रकार बाळासाहेब तनपुरे, मुख्याध्यापक भागवतराव मुठे, मुक्ताराम वाकचौरे यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी सोनिया, कु.माही मनोज यादव, कु.मनस्वीगुरू गोविंदराज पंजाबी, वल्लभ सिद्धार्थ लिंगे यांनी श्रीकृष्ण भक्ती गीते सादर केली. प्राचार्य शेळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बक्षीस प्राप्त मुलांचे कौतुक करीत म्हणाले, कै.प.पू प.महंत ब्रीजलाल दादा पंजाबी यांनी गेल्या30-35 वर्षापासून विविध उपक्रम सुरू केले. ते गेले असले तरी महंत गोविंदराज दादा, महंत विशालदादा शास्त्री आणि आश्रमातील तपस्विनी माता भगिनींनी ह्या सेवाभावी उपक्रमांची परंपरा सुरु ठेवली आहे. स्व. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांचे या मंदिराशी अतूट नाते होते. ते अनेक उपक्रमात सहभागी होत असत. श्रीरामपूरमधील असे महानुभावीय श्रीकृष्ण मंदिर अनेक वर्षापासून सर्वांना बरोबर घेऊन शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, धार्मिक उपक्रम घेत आहे, हे कौतुकास्पद आहे असे सांगून त्यांनी कै. ब्रीजलाल दादा पंजाबी यांचे वेगळेपण सांगितले. यावेळी संवत्सरचे महंत प्रदीपदादा महानुभाव, चिंतामणीभाऊ, गणेश जाधव, राऊतभाऊ, नंदकुमार जोशी, प्रभाकर पवार, वेणूनाथ पवार, राऊतभाऊ, दत्ता भावसार, रुद्र कल्पेश शर्मा आदीसह मंदिरातील तपस्विनी माता, भक्तमहिला उपस्थित होते. मंदिरातर्फे सर्वांना प्रसाद देण्यात आला. महंत गोविंदराज दादा यांनी महंत ब्रीजलाल दादा पंजाबी यांच्या भावपूर्णआठवणी सांगत त्यांच्यानंतरही सर्वजण सहकार्य करतात याबद्दल सर्वांचे आभार मानले.

COMMENTS