देवळाली प्रवरा ः पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी सांप्रदायातील संस्कृतीची ओळख आहे. सर्व जाती धर्माला एकञ जोडणारा वारकरी समाजाचा उत्सव आहे. श्री योगी
देवळाली प्रवरा ः पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी सांप्रदायातील संस्कृतीची ओळख आहे. सर्व जाती धर्माला एकञ जोडणारा वारकरी समाजाचा उत्सव आहे. श्री योगीराज त्रिंबकराज दिंडी सोहळा महाराष्ट्रातील दिंडी सोहळ्यातील आर्दश दिंडी सोहळा आहे. दिंडी सोहळा सांगता प्रसंगी काल्याची कीर्तन सेवा आर्दश व परंपरासेवा आहे. देवळाली प्रवरा गावाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय परंपरा आहे. योगायोगाने तरुण पिढी धार्मिक कार्यक्रमाची धुरा सांभळतात हि महत्वाची गोष्ट आहे.असे ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा येथिल श्री योगीराज ञिंबकराज पायी दिंडी सोहळ्याची सांगतानिमित्त ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. किर्तनसेवेसाठी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनीं प्रकाश ्॥1्॥ काला वांटू एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥वांकुलिया ब्रम्हादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥2्॥ तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ्॥ 3 ्॥ अभंग निवडण्यात आला होता. कीर्तनसेवे दरम्यान दुष्टांत देताना पंढरीच्या वारीचे वर्णन शब्दात करणे अवघड आहे.त्याचा अनुभव आनंद घ्यावा लागतो. सतांनी जातीचा विचार केला नाही,ना जात सांगितली,ना कोणाला जात विचारली परमार्थात सेवक म्हणुन काम केले आहे. देवळाली प्रवरा या गावातुन योगिराज ञिंबकराज, बाबुराव पाटील, संत महिपती महाराज दिंडीचे चालक देवळालीतील आहे.म्हणून हे गावच भक्तीच्या रसाने भरलेले आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले. यावेळी दिंडीचे संस्थापक सीताराम ढुस,दिंडीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम,उपाध्यक्ष बाबा महाराज मोरे,सचिन ढुस तसेच भाजपाचे प्रांत सदस्य आसाराम ढुस, साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, बाळासाहेब कदम, मंजाबापू वरखडे, रविंद्र महाराज पायमोडे, बाबानंद महाराज वीर, बाबासाहेब महाराज वाळुंज, नामदेव महाराज शास्त्री जाधव, बापू महाराज कोतकर, विलास महाराज कोतकर, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, सुखदेव मुसमाडे, अशोकराव खुरुद, राजेंद्र लोंढे, सतीश वाळुंज, डॉ. अशोक मुसमाडे, भगवान महाराज मोरे, किशोर महाराज निर्मळ, गितामाई धसाळ, सुदाम भांड, भगवानसिंग चंदेल, संजय कदम, रणजित राजळे, सूर्यभान कदम, नानासाहेब कोतकर, भाऊसाहेब कोतकर, बाबासाहेब कोतकर, ज्ञानदेव कोतकर, राजूभाऊ कोल्हे, बापूसाहेब जाधव, बाबासाहेब सांबारे, राजेंद्र चव्हाण, कांता कदम जातप,आदींसह देवळाली प्रवरा, लाख, आंबी, करजगाव, कोल्हार, लोणी, दवणगाव, बाभळेश्वर येथिल भक्तांसह पंचक्रोशीतील भाविक व भजणी मंडळ उपस्थित होते.
COMMENTS