Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड मायंबा रोपवेचे काम मंजूर  : आ. मोनिका राजळे

पाथर्डी : तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, मायंबा या सुमारे साडेतीन किलो मीटर लांबीच्या रोपवेच्या कामास

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजीबाई बजावणार  मतदानाचा हक्क
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन –  मुख्यमंत्री फडणवीस
कोल्हापुरमध्ये धक्कादायक घटना; रिक्षाचालकाने महिलेला फरफटत नेलं

पाथर्डी : तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, मायंबा या सुमारे साडेतीन किलो मीटर लांबीच्या रोपवेच्या कामास केंद्रीय परिवहन व भूपृष्ठ वाहतूक मंत्री  नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला योजनेअंतर्गत तत्वता: मान्यता मिळाली असल्याची माहीती आ. राजळे यांनी दिली.

       याबाबत अधिक माहीती देतांना आ. राजळे म्हणाल्या की, श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथ समाधी मंदिर असून चैतन्य कानिफनाथ मंदिरापासून जवळच श्री क्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री क्षेत्र कानिफनाथ गड ते श्री मच्छिंद्रनाथ गड हे गर्भगिरीच्या पर्वतमय डोंगर रागांच्या परिसरात अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसलेली देवस्थाने आहेत. सदर दोन्ही देवस्थानच्या गडांना जोडणारा डोंगर रस्त्याचे अंतर 9 कि.मी. आहे. परंतू हवाई अंतर 3.6 कि.मी. आहे. या उपक्रमामुळे भाविकांचे वेळेची बचत होवून पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे. श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड सावरगांव येथे 3.6 कि.मी. लांबीच्या रोपवेच्या कामास राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला योजनेअंतर्गत शासन निर्णय क्र. रोपवे 2022/ प्र.क्र. 27/ नियो-1 अ नुसार तत्वत: मान्यता मिळाली आहे. या कामास मंजूरी मिळणेसाठी ना. गडकरी व ना. फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु होता. तसेच मागील महिन्यात श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असतांना त्यावेळीही या कामाची मागणी त्यांचेकडे केली होती. त्यावेळीच रोपवेचे काम लवकरच मार्गी लागेल असे त्यांनी आश्वसीत केले होते. रोपवेच्या या कामास मंजूरी मिळाल्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांनी केंद्रीय परिवहन व भूपृष्ठ वाहतूक मंत्री  नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

COMMENTS