Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा दहावीचा 94.22 टक्के निकाल

राहुरी ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या संस्थेचे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्

डॉ. काळे करणार दर मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी
नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 44 कोटी रुपये
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू

राहुरी ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या संस्थेचे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी मार्च 2024 चा निकाल 94.62 टक्के लागला आहे.
यामध्ये विशेष प्राविण्य-95 विद्यार्थी, प्रथम श्रेणी-96 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी-64 विद्यार्थी, तृतीय श्रेणी-09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांमध्ये कु.चव्हाण तेजल अनिल, एकूण गुण 482 ( 96.40 ), द्वितीय क्रमांक चि. उदावंत अतुल दीपक एकूण गुण 481 (96.20), तर तृतीय क्रमांक चि. देशमुख यश गोरखनाथ एकूण गुण 475 (95.00) उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन माजी आमदार चंद्रशेखरजी पा. कदम संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष मडॉ. विवेक भापकर, सेक्रेटरी ऍड. विश्‍वासराव आठरे, सहसेक्रेटरी जयंत वाघ, खजिनदार ऍड. श्रीमती दीपलक्ष्मी म्हसे, नगराध्यक्ष सत्यजित पा. कदम तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन पाटील वाळुंज, सह सेक्रेटरी अनंतराव पा.कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पा. भांड, उपाध्यक्ष श्रीमती अर्चना भालेकर, प्राचार्य कडूस पी.डी. उपप्राचार्य अल्हाट एस जी. पर्यवेक्षक भालेकर आर जे, श्री रायते एम.डी. समन्वयक श्रीम. शिंदे एस. ए., मुख्य लिपिक दळवी बी. आर, वरिष्ठ लिपिक पारधे व्ही.बी. व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पत्रकार बंधू आणि सर्व ग्रामस्थ यांनी केले.

COMMENTS